• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेत हमरीतुमरी.. वाचा सविस्तर..!

Admin by Admin
April 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेत हमरीतुमरी.. वाचा सविस्तर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पक्षविस्तारासाठी राज्यभर काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेवेळी कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. यावेळी पक्षाचे आ. इद्रिस नायकवडी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या गौरव रथयात्रेदरम्यान सांगलीत फोटो काढण्याच्या कारणावरून कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.

गौरव रथयात्रा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने या प्रकाराची चर्चा होते आहे. हा वाद केवळ फोटोपुरता मर्यादित नसून, यामागे विकासकामासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंजूर केलेल्या पाच कोटी निधीच्या टक्केवारीच्या वादातून पुन्हा एकदा तणाव उफाळल्याची जोरदार चर्चा आहे.

मिरजेचे आमदार आ. नायकवडी यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आणि जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळासाठी वाद शांत झाला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस कायम राहिली. काही वेळाने पुन्हा एकदा वादाचा धुरळा उडाला.घटनास्थळी असलेले पदाधिकारी व वरिष्ठ कार्यकर्ते या वादावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असून सांगलीतील राष्ट्रवादी गटातल्या अंतर्गत वादाने पक्षासाठी नवीन डोकेदुखी निर्माण केल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

मोठी बातमी ! सांगलीतील ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, काय घडतंय?

Next Post

मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेत्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दगाफटका, भाजपा आमदाराने केला गौप्यस्फोट..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेत्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दगाफटका, भाजपा आमदाराने केला गौप्यस्फोट..?

मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेत्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दगाफटका, भाजपा आमदाराने केला गौप्यस्फोट..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group