Thursday, June 5, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण

Admin by Admin
April 23, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
0
कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आजपर्यंत कोट्यवधी प्रवाशांना अंगाखाद्यावरून नेणाऱ्या कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला आज १३४ वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून लोहमार्गाच्या उभारणीसाठी सरकारी खजिन्यातून २२ लाख ९९ हजारांची मदत देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मिरज रेल्वे स्थानकावर अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या वेळी भाजप नेते व रेल्वे क्षेत्रीय सदस्य श्री. रोहित चिवटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

या वेळी श्री. चिवटे म्हणाले, ‘२ मे १८८८ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. लगेच दुसऱ्या दिवशी ३ मे १८८८ रोजी त्यांनी कोल्हापूर- मिरज लोहमार्गाची पायाभरणी केली. हा संपूर्ण खर्च २२ लाख ९९ हजार इतका आला. हा सर्व खर्च कोल्हापूर संस्थानाच्या वतीने करण्यात आला होता. तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करून २१ एप्रिल १८९१ रोजी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.

या मार्गामुळे, तसेच मिरज रेल्वे जंक्शन झाल्यामुळे आज मिरजमधून काश्मीर ते कन्याकुमारी व कच्छ ते बंगालपर्यंत मिरज शहर रेल्वे मार्गामुळे संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. या जंक्शनमुळे मिरजच्या व्यवसायवृद्धीसाठी विशेषत: संगीतातील तालवाद्य, तंतुवाद्य या उपकरणासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली आहे. तसेच, मिरज आरोग्य पंढरी म्हणून नावारूपास येण्यासाठी मिरज जंक्शनचा बहुमोल वाटा आहे.

या वेळी स्टेशन प्रबंधक जे. आर. तांदळे, वाणिज्य निरीक्षक श्री. जॉन, मुख्य तिकीट निरीक्षक पी. बी. मराठे, सहायक मंडळ अभियंता सरोजकुमार, मुख्य निरीक्षक (विद्युत) अक्षय टेंबरे, सुनील कुलकर्णी, श्रीमती शारदा माळी, श्रीमती संगीता बागणे, राजश्री कोरे, यमुना चिकोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

ब्रेकिंग | सांगलीतील चार माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

बीड पोलिसांनो, बांगड्या भरा! ‘मला तुमची मुलगी द्या’ म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बीड पोलिसांनो, बांगड्या भरा! ‘मला तुमची मुलगी द्या’ म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले!

बीड पोलिसांनो, बांगड्या भरा! 'मला तुमची मुलगी द्या' म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विवाहितेला तिच्या मुलासह सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group