• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बीड पोलिसांनो, बांगड्या भरा! ‘मला तुमची मुलगी द्या’ म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले!

Admin by Admin
April 23, 2025
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
बीड पोलिसांनो, बांगड्या भरा! ‘मला तुमची मुलगी द्या’ म्हणत गावगुंडाने शिक्षकाला ट्रॅक्टरने चिरडले!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

बीडमधील गावगुंडांसमोर पोलिसांनी सपशेल बांगडय़ा भरल्याचे दिसून येत आहे. केज तालुक्यात एकतर्फी प्रेमातून गवंडीकाम करणाऱ्या एका गावगुंडाने ‘तुमची मुलगी मला द्या’ असे म्हणत एका शिक्षकाला गाडीसह ट्रक्टरखाली चिरडले!

गंभीर अवस्थेत या शिक्षकाला बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या गुंडाच्या विरोधात यापूर्वी अॅट्रॉसिटी आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असून तो नुकताच जामिनावर सुटला आहे.

बाजीराव डोईफोडे हे तालुक्यातील वरपगाव येथे शिक्षक आहेत. केजहून ते दररोज वरपगावला जाऊन येऊन करतात. डोईफोडे यांच्या मुलीला सूरज दिलीप गुंड (28) हा एकतर्फी प्रेमातून बऱ्याच दिवसांपासून त्रास देत होता. ‘तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते व्हायरल करीन!’ अशी धमकीही तो तीला देत होता. सूरजच्या विरोधात डोईफोडे कुटुंबाने शिवाजीनगर आणि केज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.

कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

सूरजच्या गुंडगिरीमुळे डोईफोडे कुटुंब दहशतीखाली आहे. पोलिसांकडे दाद मागूनही उपयोग होत नाही. सूरजला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी या कुटुंबाची मागणी असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ट्रॅक्टरखाली चारचाकी चिरडली…

पोलिसांनी सूरजच्या मस्तवालपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची मुजोरी वाढली. बाजीराव डोईफोडे हे आज वरपगावकडे जात असताना सूरजने त्यांची चारचाकी अडवून ‘तुमची मुलगी मला द्या, माझे लग्न तुमच्या मुलीशी लावून द्या’ अशी मागणी केली. मात्र बाजीराव डोईफोडे यांनी सूरजला झिडकारले. त्यानंतर एकतर्फी प्रेमात अंध झालेल्या सूरजने डोईफोडे यांच्या चारचाकीवर भरधाव ट्रॅक्टर घातला. एवढेच नाही तर डोईफोडे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात बाजीराव डोईफोडे हे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना अगोदर केजच्या रुग्णालयात आणि त्यानंतर बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Previous Post

कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण

Next Post

मोठी बातमी | मिरजेत पक्षाला दिशा देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत वाद, मारामारी : काँग्रेस बैठकीतील प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मिरजेत पक्षाला दिशा देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत वाद, मारामारी : काँग्रेस बैठकीतील प्रकार

मोठी बातमी | मिरजेत पक्षाला दिशा देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत वाद, मारामारी : काँग्रेस बैठकीतील प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group