• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीतील चार माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

Admin by Admin
April 22, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीतील चार माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह अनेक प्रमुख नेते आज-मंगळवारी (दि. 22) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील क्रिकेट क्लब कार्यालयात हा प्रवेश सोहळा होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी यावेळी प्रमुख उपस्थित असणार आहेत. माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जतचे नेते सुरेश शिंदे आदी प्रवेश करणार आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर अनेकजण महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून जगताप यांच्यासह जिल्ह्यातील चार माजी आमदारांची राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

महिनाभरात या नेत्यांच्या दोनदा बैठका झाल्या. त्यांनी तटकरे यांच्याशी संपर्क साधला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागची भूमिका मांडली. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. तो उद्या मुंबईत होत आहे.

  • विकास कामांबाबत नेत्यांच्या भेटी : चंद्रहार पाटील

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेही मुंबईत महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विकास कामांबाबत विशेषतः खेळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर भेटी सुरू आहेत. विकास कामे होणे महत्त्वाचे आहे. भेटीवरून तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र मी अद्याप पक्ष प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Previous Post

गोपनीय खबऱ्या विशेष | पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ प्राचीन मंदिराचे सप्तभूमिज शिखर आले पाण्याबाहेर..!

Next Post

कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण

कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला १३४ वर्षे पूर्ण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group