• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक काकडे

- मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Admin by Admin
April 18, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक काकडे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

वैद्यकीय क्षेत्र हे आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अचानकपणे उद्‌भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन सज्ज असणे आवश्यक असते. या अनुषंगाने अचानक उद्‌भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन व रूग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे व्यक्त केला.

मेहता हॉस्पिटल येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. अजित मेहता, डॉ. पराग शहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, डॉ. संजय पाटील, डॉ. अनिरुध्द पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नागरिकांच्या, रूग्णांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. अचानक उद्‌भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे, कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याची मानसिकता तयार होण्यासाठी अशी प्रशिक्षणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालये व अन्य खाजगी रूग्णालयात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सोदाहरण सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिकेचा अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभाग आणि मेहता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉस्पिटल सेफ्टी प्लॅनअंतर्गत मेहता हॉस्पिटल येथे या उपक्रमाचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी हॉस्पिटल सेफ्टी प्लॅन तयार करण्याबाबतची माहिती प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर चे डॉ. संजय पाटील यांनी व रूग्णालयात आगीबाबत दुर्घटना घडू नये यासाठी आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी मेहता हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निशमन उपकरण वापरण्याचे प्रशिक्षण दिले.

Previous Post

सांगली | अचानक घरातील कपडे पेटले, चित्र- विचित्र घडू लागलं, यंत्रणा लागली अन् भानामती आली भानावर..!

Next Post

ब्रेकिंग | महादेवराव महाडिकांनी अचानक घेतली आमदार कोरेंची भेट; अर्धा तास बंद खोलीत चर्चा, ‘गोकुळ’चं राजकारण तापणार!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | महादेवराव महाडिकांनी अचानक घेतली आमदार कोरेंची भेट; अर्धा तास बंद खोलीत चर्चा, ‘गोकुळ’चं राजकारण तापणार!

ब्रेकिंग | महादेवराव महाडिकांनी अचानक घेतली आमदार कोरेंची भेट; अर्धा तास बंद खोलीत चर्चा, 'गोकुळ'चं राजकारण तापणार!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group