वारणानगर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक अचानक वारणेत येऊन चक्क वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेतली. यावेळी महाडिक यांनी आमदार कोरेंचाच सत्कार केला.
आप्पाच्या हातातील फुलांचा बुके पाहिल्यानंतर ‘आप्पा बुके कशाला आणायचा, असा कोरेंनी सवाल करताच ‘सावकर… इथूनपुढे मला कायम बुके घेऊन यायला लागणार’ असे सन्मानाचे उत्तर मिळताच सावकरही भारावून गेले.
आज अचानक माजी आमदार महादेवराव महाडिक वारणानगर येथील जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी कार्यालयात आमदार विनय कोरे उपस्थित होते. समोरासमोर भेट झाल्यानंतर आप्पांनी बुके देऊन सावकरांचेच स्वागत केले.
गोकुळ राजकारणाचा विषय अन् दिलखुलास चर्चा..!
दरम्यान, या भेटीत गोकुळसह जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा झाल्याचे समजते. त्यांची अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. महाडिक-कोरे भेटीने पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. भेटवेळी राजाराम सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील उपस्थित होते.

