• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट…

Admin by Admin
May 8, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : बेडग (ता. मिरज) येथे वसुदा गुरुपाद लकडे (वय 62) या वृद्धेचा अज्ञाताने निर्घुण खून केला. रविवारी (दि.8) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसुदा यांचे लग्न झाले होते. परंतु गेल्या ३५ वर्षांपासून त्‍या माहेरीच राहत होत्या. रविवारी सायंकाळी त्या नेहमी प्रमाणे त्यांच्या शेतात असलेल्या म्हसोबा मंदिराकडे गेल्या होत्या. परंतु बऱ्याचवेळ झाला तरी त्या घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.

दरम्‍यान, घरापासून जवळपास 700 मीटर अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतातील पायवाटेपासून 20 फूट आत त्‍यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या शरीरावर व चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. अज्ञाताने हत्याराने हल्ला करून खून केला. परंतु वसुदा यांच्या अंगावर असलेले सोने मात्र आहे तसेच होते.

त्यामुळे वसुदा यांचा नेमका कोणत्या कारणातून खून करण्यात आला हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या खूना संदर्भात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूदृ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी

Next Post

बेकायदा सावकारीचा जत पोलिसांकडून पर्दाफाश…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेकायदा सावकारीचा जत पोलिसांकडून पर्दाफाश…

बेकायदा सावकारीचा जत पोलिसांकडून पर्दाफाश...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group