• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेकायदा सावकारीचा जत पोलिसांकडून पर्दाफाश…

Admin by Admin
May 8, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बेकायदा सावकारीचा जत पोलिसांकडून पर्दाफाश…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : खबऱ्या प्रतिनिधी/ शहरातील विठ्ठल नगर येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर सावकारी करणार्‍याचा पर्दाफाश केला. या कारवाईत वीस कोरे स्टँप, वेगवेगळ्या बँकेचे ७८ चेक, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी कार, यासह अनेक मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

ही कारवाई (शुक्रवार) करण्यात आली. जत तालुक्यातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्‍याचे म्‍हटले जात आहे. एका फिर्यादीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुभाष उर्फ लखन पवार (रा. विठ्ठलनगर, जत) याच्याविरोधात सावकारी अधिनियम, खंडणीचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संशयित आरोपी पवार हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहरातील एका तक्रारदाराने सुभाष पवार याच्‍याकडून १६ ऑक्टोंबर २०२१ रोजी एक लाख 50 हजार रुपये आठवड्याला १२ टक्के व्याजदराने घेतले होते. आज अखेर तक्रारदार याने दोन लाख 52 हजार रुपये परत केले आहेत. या व्यतिरिक्त संशयित आरोपी सुभाष पवार याने तक्रारदाराकडे आणखी दोन लाख १० हजारांची मागणी केली. तसेच त्‍याचे अपहरण करण्‍याची धमकीही दिली होती.

तक्रारदाराने गुरुवारी जत पोलिसात तक्रार दिली. जतच्या पोलिस निरीक्षकांसह सर्व स्टाफने रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अचानक संशयीत आरोपी लखन पवार याच्या घरावर छापा टाकला. यावेळी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे वीस कोरे स्टँप, वेगवेगळ्या बँकेचे ७८ चेक, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी कार, ट्रॅक्टरचे आरसी बुक, टीटी फॉर्म, दोन हिशोबाच्या वह्या व संशयित आरोपींचे वेगवेगळ्या बँकेचे पासबुक, एक कॅलक्युलेटर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जत शहरातील बेकायदाशीर सावकारीवरील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते तपास करीत आहेत.

Previous Post

बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट…

Next Post

…तर आमदारकीचा राजीनामा द्या, वैभव पाटील यांचे आमदार बाबर यांना आव्हान.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
…तर आमदारकीचा राजीनामा द्या, वैभव पाटील यांचे आमदार बाबर यांना आव्हान.

...तर आमदारकीचा राजीनामा द्या, वैभव पाटील यांचे आमदार बाबर यांना आव्हान.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group