• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार – ॲड. गायकवाड यांची घोषणा

Admin by Admin
April 15, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • उल्हासनगर प्रतिनिधी | नीतू विश्वकर्मा 

कुत्र्यांनी माणसांना चावण्याच्या घटना सामान्य असल्या, तरी अलीकडेच घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. संभाजी भिडे यांना चावलेल्या कुत्र्याबाबत आता नवा दावा पुढे आला आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी या कुत्र्याला शोधून त्याला दत्तक घेण्याचा आणि त्याच्या संपूर्ण देखभालीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

यासंदर्भात बोलताना ॲड. जय गायकवाड म्हणाले, “मी आजपर्यंत अनेक कुत्रे पाळले आहेत. मला नेहमीच अनुभव आला आहे की, माणुसकी आणि करुणा या बाबतीत अनेकदा कुत्रे माणसांपेक्षा श्रेष्ठ असतात. कुत्रे केवळ वेडे झाल्यावर नाही, तर समाजासाठी घातक असलेल्या व्यक्तींना ओळखूनही चावतात.”

त्यांनी पुढे सांगितले, “संभाजी भिडे हे या पिढीसाठी एक घातक विचारांचे प्रतीक आहेत. त्यांच्यातील माणूसपण संपलेले आहे, हे त्या कुत्र्याने ओळखले आणि त्याने धडा शिकवला. त्यामुळे मी त्या कुत्र्याचा शोध घेणार आहे. ज्याला भिडेंना चावल्याचा गौरव मिळाला, त्याचा मी पूर्ण सांभाळ करणार आहे. त्या कुत्र्याने जे केलं, ते समाजासाठी आवश्यक होतं.”

तसेच, या कुत्र्याचा शोध घेत असल्याची माहिती देत ॲड. गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केलं की, संबंधित कुत्र्याची माहिती असल्यास 9503969098 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सध्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कुत्र्याच्या वागणुकीवरून माणसाच्या चारित्र्याचा उल्लेख करणं ही घटना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

Previous Post

ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ

Next Post

हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group