Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

Admin by Admin
April 15, 2025
in विशेष
0
हापूसचा तोरा नरमला ; 1200 रुपये डझन विकला जाणारा हापूस आंबा आता फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळणार, पुढे कसे राहणार भाव ?

गुढीपाडव्याच्या दिवशी खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सगळीकडेच आंब्याला मोठी मागणी असते. सध्या हापूस आंब्याचे दर 200 ते 800 रुपये प्रति डझनपर्यंत खाली आले आहेत. महत्त्वाची बाब अशी की हापूस आंब्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात साधारणता गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. यानुसार आता राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गुढीपाडव्याला आंब्याला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सगळीकडेच आंब्याला मोठी मागणी असते.

यामुळे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या रेटमध्ये मोठी वाढ झाली होती. पण त्यानंतर आंब्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण झाली आहे. यामध्ये हापूस आंब्याचे रेट सुद्धा लक्षणीय कमी झाले आहेत.

खरंतर गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळाला होता, त्यादिवशी मुंबईच्या बाजारात कोकणातून 79,746 पेट्या तर इतर राज्यांतून 33,160 पेट्यांची आवक झाली होती. मात्र, आता आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या आठवड्यात आंब्याचे दर 300 ते 1200 रुपये प्रति डझन इतके होते, मात्र आता यात बरीच घसरन दिसून येत आहे. सध्या हापूस आंब्याचे दर 200 ते 800 रुपये प्रति डझनपर्यंत खाली आले आहेत.

महत्त्वाची बाब अशी की हापूस आंब्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तथापि, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेचा मोठा सण साजरा होणार असून या दिवशी हापूस आंब्याचे दर कसे राहतात ? हे पाहणे विषय उत्सुकतेचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या राजधानी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक अजूनही उल्लेखनीय आहे. येथील मार्केटमध्ये सोमवारी तब्बल 1 लाख 13 हजार पेट्यांतून सुमारे 253 टन आंबा बाजारात दाखल झाला होता.

बाजारांमध्ये मोठी आवक होत असल्याने आता आंब्याचे दर घटले आहेत. साहजिकच रेटमध्ये कपात झाली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळतोय. दरम्यान, सोमवारी आलेला आंबा या आठवड्याच्या अखेरीस पूर्णपणे पिकून विक्रीसाठी तयार होईल.

त्यामुळे पुढच्या आठवड्यात आंबा आणखी स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. आंब्याची वाढती आवक आणि घसरते दर पाहता, सर्वसामान्य ग्राहकांना आता अधिक परवडणाऱ्या किमतीत हापूस आंब्याचा आनंद घेता येणार आहे.

खरेतर, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले, कारण म्हणजे यावर्षीचे हवामान आंबा पिकासाठी विशेष अनुकूल ठरले. दरम्यान कोकणातील हापूस आंब्याचे विक्रमी उत्पादन अन आता आंब्याची थोडीशी कमी झालेली मागणी या सर्व पार्श्वभूमीवर आंब्याचे दर घसरलेले आहेत. सध्या हापूस आंबा फक्त दोनशे ते आठशे रुपये प्रति डझन या दरात विकला जातोय.

Previous Post

ब्रेकिंग | संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार – ॲड. गायकवाड यांची घोषणा

Next Post

ब्रेकिंग | सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

ब्रेकिंग | सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014