• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक ब्रेकिंग | पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, नंतर गुप्तांगात हळदी-कुंकू लावलेले लिंबू पिळले; जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Admin by Admin
April 15, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक ब्रेकिंग | पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, नंतर गुप्तांगात हळदी-कुंकू लावलेले लिंबू पिळले; जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • पुणे प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे पतीने घृणास्पद कृत्य केलं आहे. पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला

त्यानंतर हळदी-कुंकु लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगात पिळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार विशालनगर पिंपळे निलख येथे वर्षभरापूर्वी घडलेला आहे. याबाबत 36 वर्षीय पीडित महिलेने 11 एप्रिल रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती या दोघांचा 2004 मध्ये विवाह झाला आहे. या दाम्पत्याला 2 मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून वाद करत होता. सातत्याने हे वाद होत असल्याने 2023 मध्ये पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपी पती हा पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. दरम्यान, मुलांची शाळा सुरू होणार असल्याने आणि त्यांची वह्या पुस्तके पतीच्या घरीच असल्याने पत्नी ते आणण्यासाठी पतीच्या घरी गेली.

  • कोयता पत्नीच्या गळ्यावर ठेवत अत्याचार

घरी गेल्यानंतर, त्यावेळी महिलेची आई, मामी आणि मुले ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. तर पत्नी वरील मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून साहित्य घेण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पती दारू प्यायलेला होता. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली आणि काय काय समान घेऊन जाते, असे म्हणत पतीने पीडित पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पतीने मद्यप्राशन केले असल्यामुळे पत्नीने त्याला प्रत्युत्तर दिले नाही.’मी बोलतो तरी माझ्याकडे बघत नाही’ असे म्हणत पतीने घरातील कोयता काढला. त्यानंतर हा कोयता पत्नीच्या गळ्यावर ठेवला.

  • पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध…

त्यानंतर पत्नीला कपडे त्याने जबरदस्तीने काढायला लावले. त्यानंतर पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पतीने घरातून हळदी कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. लिंबाच्या फोडी पतीने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या. ‘मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे. तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझा मर्डर करतो’ अशी धमकीही त्याने दिली. हा भयंकर प्रकार घडल्यावर संबंधित महिला कोणाला काही न बोलता आई आणि मुलांसह घरी गेली. काही दिवसानंतर तिने हा प्रकार आपल्या आई आणि मामीला सांगितला.

या प्रकारानंतर कुटुंब घाबरून गेले होते. घडलेला प्रकार कोणाला सांगावा हे कुटुंबीयांना कळत नव्हते. त्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबातील परिचित असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता दीपक कांबळे याला घडलेल्या प्रकाराबाबत सांगण्यात आले. कांबळेने तातडीने ही माहिती सांगवी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर पीडित महिलेला घेऊन सांगवी पोलीस ठाण्यात गेले आणि फिर्याद नोंदवली. फौजदार तेजस्विनी म्हेशाळे तपास करीत आहेत.

घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आरोपी पती विकृत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याची गरज आहे. तसेच पीडित महिलेला मनोधैर्य योजना अंतर्गत आर्थिक मदत द्यावी जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनातील कठीण परिस्थितीत मदत मिळेल.

– दीपक कांबळे (सामाजिक कार्यकर्ते)

संबंधित पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे फिर्याद दाखल करून घेतली आहे. 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला कायद्याने अटक करता येत नाही. परंतु, आरोपीवर आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा महिला अधिकाऱ्याकडून तपास केला जात आहे.

-महेश बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणा

Next Post

ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ

ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group