• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मजुरांनी भरलेल्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक; २ महिलांचा मृत्यू

Admin by Admin
April 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मजुरांनी भरलेल्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक; २ महिलांचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • कवठेमहांकाळ प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज-पंढरपूर महामार्गावर कुची गावाच्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात द्राक्ष व मजुरांनी भरलेल्या टेम्पोला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ मजूर जखमी झाले आहेत. टेम्पो व द्राक्षांचे मिळून सुमारे ५.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रकचालक अपघातानंतर वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहितीअशी की, मोदीनसाब आप्पाहुसैन सांबरेकर (वय ३१, रा. बेळगाव, कर्नाटक) हे आपल्या ताब्यातील टेम्पो (क्र. केए-२२-एए-४७७०) मधून द्राक्षे व मजूर घेऊन पंढरपूरहून बेळगावकडे जात होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुची गावाजवळील एसआर हॉटेलपासून १०० मीटर अंतरावर असताना भरधाव ट्रक (क्र. एचआर-६७-डी-०३७९) ने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की टेम्पोतील काही मजूर रस्त्यावर फेकले गेले. त्याच ट्रकने समोर असलेल्या टँकर (क्र. एमएच-०८-बीसी-९००९) ला देखील धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झाला. या अपघातात भारती राजू कांबळे आणि रेखा त्रिपाटी कांबळे या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जखमींमध्ये कांचना पांडुरंग कांबळे, रूपा बाळकृष्ण माने, पार्वती नंदु कांबळे, मंगल लक्ष्मण बेरड, आप्पासाहेब महादेव वाघमारे, वनिता बाबासो माने, मंगल बजरंग आवळे, कबीर शंकर कांबळे आणि श्रेयांश बाळकृष्ण माने यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात टेम्पोचे अंदाजे १.५ लाख, द्राक्षांचे १ लाख तर अन्य वाहनांचे मिळून एकूण अंदाजे ५.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर करीत आहेत.

Previous Post

धक्कादायक ब्रेकिंग | कुपवाड एमआयडीसीत युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून ..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू

सांगली ब्रेकिंग | संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group