

- कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कुपवाड एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौक परिसरात युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजयनगर येथील रहिवाशी समीर नदाफ, वय २७ वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. समीर याच्यावर हुबेहूब कोयत्यासारखे दिसणारे लोखंडी जाड पात्याचा हत्याराने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
खुनात रक्तबंबाळ झालेल्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला आहे.खून झालेला युवक हा गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.