• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिरोळमधील हेरवाडला ‘विधवा प्रथा’ बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल

Admin by Admin
May 7, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
0
शिरोळमधील हेरवाडला ‘विधवा प्रथा’ बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजर्षी शाहू छत्रपतींची स्मृती शताब्दी होत असताना कोल्हापूरने राजर्षींचा पुरोगामी वारसा कृतिशीलपणे पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येेथील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे.

महिलांनी यासाठी पुढाकार घेऊन समाजात विधवा म्हणून अपमानाचे जगणे झुगारून देण्याचे ठरविले आहे.

एखाद्या व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरताना अनेक अडचणी येतात. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसले जाते, गळ्यातील मंगळसूत्र तोडण्यात येते. हातातील बांगड्या फोडून, पायातील जोडवी काढून घेतली जातात. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्‍तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. विधवा प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. यापुढे हेरवाड (ता. शिरोळ) येथे विधवा प्रथा बंद करण्यात येत असल्याचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेने केला आहे.

Previous Post

तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, ‘या’ तारखेला होईल निवडणूक..

Next Post

सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी

सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group