• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, ‘या’ तारखेला होईल निवडणूक..

Admin by Admin
May 7, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, ‘या’ तारखेला होईल निवडणूक..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा थांबलेला कार्यक्रम पुन्हा जाहीर केला असून, निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आता नव्याने मागवल्या आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या प्रभाग रचना नुसारच निवडणुका होणार हे आता स्पष्ट झाले आहे. तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना केलेली होती, मात्र राज्य सरकारने ही प्रभाग रचना रद्दबादल ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या निकालानुसार प्रभाग रचनेची सुरू असलेली प्रक्रिया निवडणूक आयोगाने पुढे चालू ठेवलेले असून नवे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिकासाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर १० मे पासून १४ मे पर्यत हरकती दाखल करणे, त्यावर २३ मे पर्यंत सुनावणी घेणे, ३० मे पर्यंत हरकतींवर निर्णय घेऊन विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणे आणि ६ जून २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे ७ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस प्रसिद्धी देणे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभाग रचनेचा हा कार्यक्रम १० मार्च २०२२ पासून थांबलेला होता.

जिल्ह्यात प्रक्रिया सुरू

निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशावरून हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील थांबलेल्या सर्व नगरपालिकाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे स्पष्ट झाले असून जूननंतर नवी प्रभाग रचना, नवीन सदस्य संख्या यावर निवडणुका होणार हे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

शिक्षण विभागात केला ‘या’ दोघांनी नंगानाच…? रंगेहाथ सापडले पावणे दोन लाखांची घेताना लाच…!

Next Post

शिरोळमधील हेरवाडला ‘विधवा प्रथा’ बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिरोळमधील हेरवाडला ‘विधवा प्रथा’ बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल

शिरोळमधील हेरवाडला 'विधवा प्रथा' बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group