• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिक्षण विभागात केला ‘या’ दोघांनी नंगानाच…? रंगेहाथ सापडले पावणे दोन लाखांची घेताना लाच…!

Admin by Admin
May 7, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
शिक्षण विभागात केला ‘या’ दोघांनी नंगानाच…? रंगेहाथ सापडले पावणे दोन लाखांची घेताना लाच…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – मागील काही दिवसांपासून लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील सक्रिय झाला आहे. सांगलीत शिक्षकाची व त्याच्या दोन सहकाऱ्यांची पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्याच्या मोबदल्यात एक लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व अधीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय 58, रा. विश्रामबाग सांगली) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे ( वय ४१, रा. अहिल्यानगर कुपवाड) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार व त्याच्या दोन शिक्षक मित्रांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यताबाबतचे काम माध्यमिक शिक्षण विभागाकडे होते. मात्र आरोपी कांबळे आणि सोनवणे यांनी तिघांकडे प्रत्येकी 60 हजार म्हणजे एकूण 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. मात्र अखेरीस 1 लाख 70 हजार रुपयांत ठरल होतं. त्यानंतर तिघा शिक्षकांनी 24 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

दरम्यान अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदारांकडून लाचेची रक्कम स्वीकारली. ती रक्कम शिक्षण अधिकारी कांबळे यांना दिल्यानंतर दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कांबळे यांच्या राहते घरी अटक केली. लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Previous Post

“भोंगा वाजला की घरातील टीव्ही बंद , मुलं लगेच बसतात अभ्यासाला..!” सांगली जिल्ह्यात नेमकं कुठं घडतंय असं.. जाणून घ्या.

Next Post

तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, ‘या’ तारखेला होईल निवडणूक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, ‘या’ तारखेला होईल निवडणूक..

तासगाव नगरपालिकेची निवडणूक नव्या प्रभाग रचनेनुसार, 'या' तारखेला होईल निवडणूक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group