• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | उबाठाचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंनी हातात दिला ‘भगवा’..!

Admin by Admin
March 27, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली | उबाठाचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंनी हातात दिला ‘भगवा’..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

उबाठा गटातील मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, लातूरमधील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यात प्रामुख्याने वरळीमधील वृत्तपत्र विक्रेता संघाचे २०० आणि तेलगू समाजाच्या ३०० महिलांचा समावेश होता. तसेच अहिल्यानगर मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख अभिजित पोटे, उबाठा उपजिल्हाप्रमुख आशिक दहीफळे, संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, शेवगावचे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख अमर पुरनाळे यांचा समावेश होता.

तर सोलापूरचे उबाठा गटाचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे, जिल्हा समन्वयक सचिन सोनटक्के, मंगळवेढा तालुका संघटक मारुती वाघमारे, सांगली जिल्ह्याचे उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख वैभव कुलकर्णी, जिल्हा संघटक बजरंग पाटील, पुणे जिल्ह्यातील उबाठा उप शहरप्रमुख नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळासाहेब मालुसरे, वडगाव शेरीचे आनंद गोयल, लातूरच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनंत दोरवे आणि माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना, गेल्या अडीच वर्षात पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने काम केले असून, त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला दैदिप्यमान असे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे माझ्यावर दिवसरात्र फक्त टीका करणाऱ्यांना मात्र जनतेने साफ नाकारून कायमचे घरी बसवले आहे. शिवसेनेने आजवर केलेल्या कामावर विश्वास ठेवून आज आपण सारे पक्षात प्रवेश करत आहात, मात्र आपल्या विभागातील जनतेचे प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावले जातील अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी या साऱ्यांना दिली. तसेच यापुढे पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्यास सांगितले.

तसेच मुंबईतील वृत्तपत्र विक्रेता संघांच्या सदस्यांनी आज पक्षप्रवेश केला असून पक्षाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, सचिव संजय मोरे, सचिव संजय म्हशीलकर, उपनेत्या आशा मामेडी, वरळीचे विभागप्रमुख दत्ता नरवणकर, प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते संजीव भोर पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

ब्रेकिंग | अल्पवयीन मुलीचा विवाह; वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा

Next Post

सांगली ब्रेकिंग | जातीवाचक शिवीगाळ करत महिलेकडे मागितली ४० लाखांची खंडणी, सोन्याची अंगठी, डायमंड घेतले : फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | जातीवाचक शिवीगाळ करत महिलेकडे मागितली ४० लाखांची खंडणी, सोन्याची अंगठी, डायमंड घेतले : फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक

सांगली ब्रेकिंग | जातीवाचक शिवीगाळ करत महिलेकडे मागितली ४० लाखांची खंडणी, सोन्याची अंगठी, डायमंड घेतले : फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group