• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | जातीवाचक शिवीगाळ करत महिलेकडे मागितली ४० लाखांची खंडणी, सोन्याची अंगठी, डायमंड घेतले : फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक

Admin by Admin
March 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | जातीवाचक शिवीगाळ करत महिलेकडे मागितली ४० लाखांची खंडणी, सोन्याची अंगठी, डायमंड घेतले : फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करत ४० लाखांची खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत पाटील (रा. करवीर वाचनालयाशेजारी, भवानी मंडप, कोल्हापूर) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.त्याला न्यायालयात हजर केले असता, एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला विश्रामबाग परिसरात राहते. संशयित योगेश पाटील व पीडितेची नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून या कालावधीत रोख सात लाख रुपये, सोन्याची अंगठी व डायमंड रिंग घेतली. हा ऐवज परत न देता तिची फसवणूक केली.

तसेच पीडितेला पाटील याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली. तिच्या मोबाईलमधील डेटा प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून योगेश पाटील याच्याविरूद्ध ॲट्राॅसिटी, खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

योगेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले. त्यांना एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपअधीक्षक विमला एम. पुढील तपास करत आहेत.

Previous Post

सांगली | उबाठाचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंनी हातात दिला ‘भगवा’..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | जादूटोण्याचा भयंकर प्रकार; दारात बांधले बकऱ्याचे मुंडके, लिंबू, काट्याची फांजर, हळदी-कुंकू, नारळाची पूजा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | जादूटोण्याचा भयंकर प्रकार; दारात बांधले बकऱ्याचे मुंडके, लिंबू, काट्याची फांजर, हळदी-कुंकू, नारळाची पूजा

सांगली ब्रेकिंग | जादूटोण्याचा भयंकर प्रकार; दारात बांधले बकऱ्याचे मुंडके, लिंबू, काट्याची फांजर, हळदी-कुंकू, नारळाची पूजा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group