• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल

Admin by Admin
March 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

अमली पदार्थांविरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून आज इस्लामपूरजवळील ओझर्डे ते घबकवाडी रस्त्यावरील कुंभार वस्ती परिसरातून ८ लाख ४० हजार २५० रुपयांचा २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा एलसीबीच्या पथकाने जप्त केला.

दरम्यान, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. सुनील रामचंद्र कुंभार (वय २८, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), सुजय बबन खोत (३४, खोत मळा, आष्टा) आणि परशुराम सिद्धलिंग पोळ (३४, पोळ गल्ली आष्टा) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः संशयित सुनील कुंभार हा सुजय खोत आणि परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा घेण्यासाठी कुंभार वस्ती येथे येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने तिघे जण कुंभार वस्ती येथे एका शेतात असणाऱ्या उसाच्या वाड्याच्या गंजीपाशी थांबले.

त्यातील एकाने गंजीखाली लपविलेल्या पांढऱ्या रंगाची गोणी काढली. त्याच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत सुनील कुंभार याने संशयित सुजय व परशुराम याच्याकडून तयार गांजा खरेदीसाठी आल्याची कबुली दिली. त्यामुळे संशयित दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नामदेव तेलंग (राजमंडरी, हैदराबाद) याच्याकडून गांजा आणल्याचे सांगितले.

पोलिसांनी संशयितांकडून गांजा, रोख २ हजार ५०० रुपये हस्तगत केले. इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर गुंगीचे औषधी द्रव, मनोव्यापार परिणाम करणारे अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, पंकज पवार, नितीन सावंत यांच्या पथकानेकारवाई केली.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | दारूची टिप पोलिसांना दिल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Next Post

ब्रेकिंग | बेडगला बाजार कर वसुलीचे आदेश: माजी सरपंचासह तिघांवर ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसेंची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | बेडगला बाजार कर वसुलीचे आदेश: माजी सरपंचासह तिघांवर ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसेंची कारवाई

ब्रेकिंग | बेडगला बाजार कर वसुलीचे आदेश: माजी सरपंचासह तिघांवर ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसेंची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group