• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | दारूची टिप पोलिसांना दिल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Admin by Admin
March 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | दारूची टिप पोलिसांना दिल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज तालुक्यातील करोली (एम) गावांत अवैध दारू विक्री सुरू आहे. एकाच गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी देशी दारूच्या बाटल्यांची खुलेआम विक्री सुरू असल्याने मिरज ग्रामीण पोलिसांनी दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकला. परंतु, “माझ्या दुकानात दारू मिळते याची टिप पोलिसांना तूच दिलीस”, असे म्हणत दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीचे रूपांतर वाढल्याने लोखंडी पात्याचे कोयते, दगड व खुरपे हातात घेऊन एकमेकांच्या शरीरावर जखमा करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, करोली (एम) या गावांत महेश बयाजी पाटोळे व श्रीकांत बाबुराव चव्हाण हे दोघेही देशी दारू व हातभट्टी विक्री करतात. मिरज ग्रामीण पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करताच, एकमेकांना जाब विचारत, गैरसमज करून, पोलिसांना टिप दिल्याच्या रागातून हाणामारी केली.

याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३२४(३)(५) व १९०, १९१(२)(३) नुसार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल ४०७ कांबळे हे करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मर्जीतल्या पानपट्टीवर मोठी कारवाई..! अवैध दारू विक्री, मटक्याच्या चिठ्ठ्या, रात्री केली होती एकास मारहाण

Next Post

इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल

इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group