• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | बेडगला बाजार कर वसुलीचे आदेश: माजी सरपंचासह तिघांवर ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसेंची कारवाई

Admin by Admin
March 26, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | बेडगला बाजार कर वसुलीचे आदेश: माजी सरपंचासह तिघांवर ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसेंची कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

बेडग (ता. मिरज) ग्रामपंचायतीत एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या ८ महिन्यांत बाजार करात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. तत्कालीन सरपंच रुपाली शिंदे व ग्रामसेवक एम. पी. कांबळे व बी. एल. पाटील यांच्याकडून ४७ हजार ५९२ रुपये अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिलेत.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बाजार कर रकमेत अपहार झाल्याची तक्रार विद्यमान सात सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे केली. त्याच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले होते. त्यानुसार वाळवा पंचायत समितीच्या उपअभियंत्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला. त्यात तत्कालीन सरपंच व दोन ग्रामसेवकांकडून बाजार कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरली नसल्याचे ताशेरे ओढले होते. त्यानुसार कारवाई सुरू असल्याने अपहार झाला होता, हे सिद्ध झाले आहे.

ही रक्कम वसूल करण्यासाठी कैलास पाटील, गौतम नागरगोजे, विष्णू पाटील, भाग्यश्री खाडे, शुभांगी सूर्यवंशी, जयश्री कांबळे व जयश्री शेळके या सात सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

त्यानंतर धोडमिसे यांनी तत्कालीन ग्रामसेवक मधुकर कांबळे यांच्याकडून ८ हजार ९२४ रुपये व बी. एल. पाटील यांच्याकडून १४ हजार ८८३ रुपये व तत्कालीन लोकनियुक्त सरपंच रुपाली दिनेश शिंदे यांच्याकडून २३ हजार ७९५ रुपये वसूल करण्याचे आदेश दिलेत. जमा झालेली रक्कम ग्रामनिधीत वापरण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी केली आहे.

  • एका ग्रामसेवकाने रक्कम भरली

तत्कालीन ग्रामसेवक एम. पी. कांबळे यांनी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली रक्कम भरली आहे. तत्कालीन ग्रामसेवक बी. एल. पाटील यानी आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. सरपंच रूपाली शिंदे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous Post

इस्लामपुरात २८ किलो गांजा जप्त, तिघांना अटक: एलसीबीची कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल

Next Post

सांगली ब्रेकिंग | ईदचा बाजार करुन घरी जाताना अपघातात दोन मुलासह तिघे ठार, महिला गंभीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | ईदचा बाजार करुन घरी जाताना अपघातात दोन मुलासह तिघे ठार, महिला गंभीर

सांगली ब्रेकिंग | ईदचा बाजार करुन घरी जाताना अपघातात दोन मुलासह तिघे ठार, महिला गंभीर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group