• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील आष्टा व अंकलखोपच्या दरोडेखोरांचा प्लॅन फसला, धाराशिवमध्ये पोलिसांनी केली अटक.

Admin by Admin
March 25, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील तीन दरोडेखोर त्यांच्या दोन अन्य साथीदारांसह धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीने आले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांची सोमवारी गस्त सुरू असताना त्यांच्या निदर्शनास आले अन् तिघे गजाआड झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरात येणारे साहित्यही जप्त केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सोमवारी पहाटे रात्र गस्तीवर धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात होते. तेथील तेरणा कारखान्याच्या परिसरातील तेरणा शाळेच्या फलकाजवळ हे पथक आले असता तेथे पाच जण अंधारात संशयितरीत्या थांबल्याचे निदर्शनास आले. पथकातील सहायक निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह कर्मचारी शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले यांनी या संशयितांची विचारपूस करण्यासाठी वाहन थांबवून त्यांच्या दिशेने जात असताना दोघांनी दुचाकी सुरू करून तेथून धूम ठोकली. पाठोपाठ संतोष प्रभाकर कुराडे, अविनाश प्रभाकर कुराडे (रा. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) व प्रवीण राजाराम मोरे (रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) हे तिघेही दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकून पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे कत्ती, कटावणी, कटर असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. सोबतच पोलिसांनी त्यांच्याकडील तीन मोबाइल व एक दुचाकी, असा ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध सपोनि. कासार यांच्या फिर्यादीवयन ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यांना ढोकी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

  • धाराशिवचे कनेक्शन काय ?

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी यापूर्वीही धाराशिव तसेच सांगली जिल्ह्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर दोन्ही जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी ही धाराशिव पासिंगची आहे. ही दुचाकी नेमकी कोणाची, त्यांचे साथीदार स्थानिक आहेत काय, याचा तपास करतानाच धूम ठोकलेल्या आरोपींना पकडण्याचे आव्हानही पोलिसांपुढे असणार आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group