Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

Admin by Admin
March 25, 2025
in मंत्रालय
0
मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन साडेतीन महिने उलटले तरी प्रशासकीय खांदेपालटाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, आणि आता पुन्हा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले आहेत.

यामध्ये पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पालवे यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे, तर मनोज रानडे यांना पालघरचे नवे सीईओ बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश संवर्गातील २०२० बॅचच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणून हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमले आहे.

  • नव्या बदल्यांची यादी –

बी. एच. पालवे (IAS: SCS: 2013) – पालघर झेडपी सीईओ यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली.

मनोज रानडे (IAS: SCS: 2024) – संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांची पालघर झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.

शुभम गुप्ता (IAS: RR: 2019) – सांगली महानगरपालिका आयुक्त यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली.

अंजली रमेश (IAS: RR: 2020) – मध्य प्रदेश संवर्गातून महाराष्ट्रात बदली, हिंगोली झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.

झेनिथ चंद्र देवंथुला (IAS: RR: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा, चंद्रपूर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट, नांदेड म्हणून नियुक्ती.

यापूर्वीच्या बदल्या –

आंचल गोयल (IAS: RR: 2014) – अतिरिक्त आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

अंकित (IAS: RR: 2019) – जळगाव झेडपी सीईओ यांची छत्रपती संभाजीनगर झेडपी सीईओ म्हणून बदली.

मीनल करनवाल (IAS: RR: 2019) – नांदेड झेडपी सीईओ यांची जळगाव झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती.

कवली मेघना (IAS: RR: 2019) – प्रकल्प संचालक, ITDP, किनवट यांची नांदेड झेडपी सीईओ म्हणून बदली.

करिश्मा नायर (IAS: RR: 2021) – प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती.

रणजित मोहन यादव (IAS: RR: 2022) – सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून बदली.

नव्या सरकारच्या काळात प्रशासनातील सातत्याने होणारे हे बदल चर्चेचा विषय ठरत आहेत!

Previous Post

मिरजेत वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे कोसळली, विद्युत पुरवठा ठप्प; नागरिकांची तारांबळ

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील आष्टा व अंकलखोपच्या दरोडेखोरांचा प्लॅन फसला, धाराशिवमध्ये पोलिसांनी केली अटक.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील आष्टा व अंकलखोपच्या दरोडेखोरांचा प्लॅन फसला, धाराशिवमध्ये पोलिसांनी केली अटक.

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014