• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमधील अतिक्रमणांवर जेसीबी

Admin by Admin
March 25, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाडमधील अतिक्रमणांवर जेसीबी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शहरातील सूतगिरणी ते कुपवाड एमआयडीसी जकात नाका या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणावर अखेर सोमवारी जेसीबी चालविण्यात आला. अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात रस्त्यावरील व फूटपाथवरील अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अतिक्रमणविरोधी पथकाने रस्त्यावर राडारोडा करणार्‍या विक्रेत्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. तीन हातगाडे, डिजिटल फलक जप्त केले, अशी माहिती सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी दिली. सहायक आयुक्त सागावकर म्हणाले, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कुपवाड शहरातील वसंतदादा सूतगिरणी ते कुपवाड एमआयडीसी जकात नाका या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली विविध अतिक्रमणे हटविली. रस्त्यावर राडारोडा करणार्‍या दोघांकडून दहा हजारांचा दंड वसूल केला.

काही व्यावसायिकांची दुकानासमोर व खोक्यासमोर असलेली अतिक्रमणे दोन दिवसात काढून घेतली जातील, असे आश्वासन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की यांनी महापालिका प्रशासनाला दिले. उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे, सहायक आयुक्त सचिन सागावकर, मुख्य स्वच्छता अधिकारी अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, गणेश धोत्रे, अंजली कुदळे, बांधकाम शाखा अभियंता अशोक कुंभार आदींनी भाग घेतला होता.

  • व्यापारी संघटनेकडून सहकार्याचे आश्वासन

शहरातील मुख्य रस्त्यावरील फूटपाथवर असलेली विविध अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. यावेळी कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, माजी अध्यक्ष अनिल कवठेकर व व्यापारी संघटनेने महापालिका प्रशासनाला सहकार्य केले.

Previous Post

ब्रेकींग | सांगलीत थेट इशाराच..! शेतकर्‍यांची वसुली थांबवा, अन्यथा संस्था पेटवू… वाचा सविस्तर

Next Post

ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकल्याने अपघात; चालकाला डुलकी, क्लिनरसह ३५ प्रवासी जखमी, हिवरी गावातील घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकल्याने अपघात; चालकाला डुलकी, क्लिनरसह ३५ प्रवासी जखमी, हिवरी गावातील घटना

ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकल्याने अपघात; चालकाला डुलकी, क्लिनरसह ३५ प्रवासी जखमी, हिवरी गावातील घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group