• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | सांगलीत थेट इशाराच..! शेतकर्‍यांची वसुली थांबवा, अन्यथा संस्था पेटवू… वाचा सविस्तर

Admin by Admin
March 25, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सरकारने निवडणुकीत शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करू, असे आश्वासन देऊन केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली. त्यामुळे आता निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा, ‘मार्च अखेर’च्या निमित्ताने शेतकर्‍यांवर सक्तीने वसुलीची कारवाई केली जात आहे, ती तत्काळ थांबवावी, अन्यथा पूर्वीप्रमाणे संस्था पेटवू, बँकांना टाळे ठोकू, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, कर्जमाफीच्या मागणीसाठी पहिल्या टप्प्यात 2 एप्रिलला शेतकरी संघटनेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथदादा यांनी केले.

ते म्हणाले, शेतकरी संघटनेच्या वतीने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून 19 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रभर प्रचार झाला. सरकारने विधानसभेत शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कर्जमुक्तीसाठी पावले उचलली आहेत. हे शेतकरी संघटनेने केलेल्या एक दिवसीय आंदोलनाचे फलित आहे. एकीकडे समिती स्थापन केलेली असताना शेतकर्‍यांवर कर्जवसुलीसाठी जप्तीची कारवाई केली जात आहे, ती तत्काळ थांबवा, अन्यथा पूर्वीप्रमाणे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संस्था पेटवून देऊ, बँकांना टाळे ठोकू . त्याशिवाय साखर कारखान्यांची अंतर अट रद्द करावी. सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीतील विटा शहरात दोघांकडून अंमली पदार्थाच्या बाटल्यांची विक्री; पोलिसांची धडक कारवाई.!

Next Post

कुपवाडमधील अतिक्रमणांवर जेसीबी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील अतिक्रमणांवर जेसीबी

कुपवाडमधील अतिक्रमणांवर जेसीबी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group