• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक

Admin by Admin
March 24, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जादा परतावा देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह सात राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील वादग्रस्त ए. एस.ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या फरार संचालिका सुधा सुधाकर खडके (वय 62, रा. गुणे गल्ली, गडहिंग्लज) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी बजावली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्षे 3 महिने 26 दिवस फरारी असलेल्या संशयित सुधा खडके गोव्यातील तळेगाव दुर्गावाडी येथे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यांना गोव्यातून अटक केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. खडके यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला. खडके यांच्यावरील कारवाईमुळे अटक झालेल्यांची संख्या 17 झाली आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.

दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांच्या पदाधिकारी, संचालक व एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, मुंबई, पुण्यासह कर्नाटक, गुजरात, राजस्थानसह सात राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारसह पदाधिकारी, संचालक, एजंटाविरुद्ध 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सुभेदारसह 16 जणांना यापुर्वीच अटक करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. मात्र सुधा खडके फरार होत्या. पथकाने अखेर त्यांना गोवा येथील तळेगाव दुर्गावाडा येथून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे.

Previous Post

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

Next Post

मोठी ब्रेकिंग | इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

मोठी ब्रेकिंग | इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group