• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

Admin by Admin
March 24, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

द्राक्षमालास दुप्पट किंमत मिळवून देतो, असे सांगून जत तालुक्यातील डफळापूर, जिरग्याळ, एकुंडी, खिलारवाडी परिसरातील ११ द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांची ७२ लाख १४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात तिघा व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद कुमार सुखदेव कोरे (रा. जिरग्याळ) यांनी जत पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अजिज युनूस हाशमी, कैफ अजिज हाशमी, शफिक (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. पवननगर बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

डफळापूर, जिरग्याळ परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. अजिज युनूस हाशमी याने चांगला दर दिल्याने परिसरातील 11 शेतकर्‍यांनी आपला द्राक्षमाल त्यास दिला. हा व्यवहार 10 जानेवारीरोजी ठरला होता. अजिज युनूस हाशमी, कैफ अजिज हाशमी, शफिक यांनी द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या द्राक्षमालाची पाहणी केली. उर्वरित द्राक्षमाल बघण्यासाठी व्यापारी अजिज आला. त्याने ‘तुमची द्राक्षे निर्यातक्षम आहेत, बाहेरच्या देशात पाठवावी लागतील, याचा मोबदलाही चांगला मिळेल’ असे सांगितले. यानुसार प्रतिबॉक्स 4 हजार 107 रुपये दर ठरला. एकूण 16 हजार 428 किलो द्राक्षमाल त्यांनी उचलला. त्या द्राक्षमालाची एकूण किंमत 11 लाख 50 हजार रुपये दोन दिवसांनी तुम्हाला देतो, असे सांगून कुमार कोरे व अन्य शेतकर्‍यांची द्राक्षे त्यांनी नेली. ठरल्यानुसार कोरे यांनी दोन दिवसानंतर संबंधित व्यापार्‍यांशी संपर्क करण्याचा दूरध्वनीवरून प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पैसे देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. तसेच ‘पैसे देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणून त्याने कोरे यांचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. यामुळे कोरे यांना आपली 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाली.

दरम्यानच्या कालावधीत राजाराम बाळू कोरे (रा. जिरग्याळ, ता. जत) यांची 5 लाख 22 हजार रुपयांची, अंबाजी दशरथ कोडलकर (रा. खिलारवाडी) यांची 3 लाख 85 हजार रुपयांची, खंडू श्रीमंत कोडलकर (रा. खिलारवाडी) यांची 8 लाख 5 हजार रुपयांची, बसवराज बालचंद्र म्हेत्रे (रा. एकुंडी) यांची 1 लाख 59 हजार रुपयांची, संजय बाबू गुड्डोडगी (रा. एकुंडी) यांची 1 लाख 79 हजार रुपयांची, लक्ष्मण बाबू गुड्डोडगी (रा. एकुंडी) यांची 2 लाख 4 हजार रुपयांची, सचिन शिवाजी चव्हाण (रा. डफळापूर) यांची 12 लाख, यशवंत अजितराव गायकवाड (रा. डफळापूर) यांची 8 लाख 50 हजार रुपयांची, सागर अनिल कुंदळे (रा. डफळापूर) यांची 12 लाख 50 हजार रुपयांची, महादेव पांडुरंग चव्हाण (रा. डफळापूर) यांची पाच लाख रुपयांची, अशी एकूण 11 द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांची 72 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक

Next Post

ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक

ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group