• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Admin by Admin
March 24, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पोलीस निरीक्षकाच्या विरोधात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलन दरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हा प्रकार रोखण्यासाठी गेलेले पोलिस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचा देखील घडला आहे. यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या अवैध धंदे सुरु आहेत. हे अवैध धंदे रोखण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र पोलीस या प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपाचे नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी भाजपकडून आंदोलन पुकारण्यात आले होते.

  • महिलांनी अंगावर ओतले डिझेल

मागणी केल्यानंतर देखील इस्लामपूरमध्ये अवैध धंदे सुरूच असल्याचा आरोप करीत आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना सुरवात केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या भाजपा महिला आघाडीच्या आशा पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

  • पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने झाली झटापट

आंदोलन करणाऱ्या महिलांनी अंगावर डिझेल ओतल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली होती. त्यांना रोखण्यासाठी पोलीस गेले असता भाजपा कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी व झटापटीचा प्रकार घडला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांची बदली करावी, अशी मागणी यावेळी इस्लामपूर भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | हजारो लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत फरार असणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या संचालिकेला गोव्यात अटक

Next Post

हजामती करत होता का. त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले.? जयंत पाटील विधानसभेत संतापले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हजामती करत होता का. त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले.? जयंत पाटील विधानसभेत संतापले

हजामती करत होता का. त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले.? जयंत पाटील विधानसभेत संतापले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group