• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक

Admin by Admin
March 23, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील आटपाडीत तलावाजवळ असणाऱ्या ओढ्यातील गवत आणि झाडांना आज दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. ओढ्यालगत गव्हाचे पीक निघाल्यानंतर राहिलेले तण जाळण्यात आले होते. त्याची ठिणगी ओढ्यात वाळलेल्या गवतात पडली.

ओढ्याच्या पात्रातील सुमारे एक किलोमीटर अंतरातील गवत, शिसवाची झाडे, झुडूपे, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल आगीत जळाल्या.

आटपाडी तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी ओढा आहे. हा ओढा ग्रामदैवत अंबाबाई मंदिराजवळून वाहतो. तो तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या शुक ओढा पात्राला मिळतो. तलावाच्या भरावाच्या पायथ्याशी शेती आहे. तलावाच्या पायथ्याशी शेतातील गव्हाचे तण जाळल्यावर त्याची ठिणगी ओढ्यातील गवताला लागली.

तीव्र उन्हाचा तडाख्याने आणि जोरदार वाऱ्याने ही आग पसरली. मगर वस्ती नजीक वाहणाऱ्या ओढ्यातील एक ते दीड किलोमीटर परिसरात ही आग पसरल्‍याने वाळलेले गवत, लाकडे, झुडूपे या आगीत जळून खाक झाली. नगरपंचायतच्या जुन्या पाणी पुरवठा विहिरी लगतच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन आणि काही केबल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या .चार पाच तास धूमसणारी ही आग सायंकाळी पाचच्या आसपास आटोक्यात आली.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड

Next Post

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group