• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड

Admin by Admin
March 23, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

करणी काढण्यासाठी ९ हजार रुपये घेऊन मध्यरात्री होम पेटवून अघोरी पूजा करताना एका भोंदूला अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या सहकार्याने शनिवारी गजाआड केले.

कसबे डिग्रज (ता.मिरज) येथील बाबूजी लखनऊ या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे मागील आठवड्यात तक्रार आली होती. त्याप्रमाणे तक्रारदार बिराप्पा पांडेगावकर यांना नकली ग्राहक बनवून त्या बुवाकडे पाठवले. त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9 हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारीच्या रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू, टाचणी, उद याचा वापर करून त्याने एक होम पेटवून अघोरी पूजा केली.

याबाबत सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. चौगुले यांना अंनिसचे कार्यकर्ते थोरात यांनी ही अघोरी पूजा होणार आहे याची माहिती दिली. चौगुले यांनी तातडीने याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक श्री. घाडगे यांना या अघोरी पूजेच्या ठिकाणी पाठवले. तेथे तो मांत्रिक अघोरी पूजा करताना रंगेहात सापडला. पोलिसांनी अघोरी पूजेचे सर्व साहित्य जप्त करून त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणून सकाळी त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

करणी, भानामती, काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही. करणी ही कपोकल्पित गोष्ट आहे. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये, अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जवळच्या पोलीस स्टेशन कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा मोठा कांड, धक्कादायक खळबळ : सांगली- कोल्हापूर – सातारा सगळेच धक्क्यात..?

Next Post

सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक

सांगली ब्रेकिंग | तब्बल दीड किलोमीटर परिसरात आग, पाच तास आगीचा तांडव, पाणी पुरवठ्याच्या पाईप आणि केबल जळून खाक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group