• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा मोठा कांड, धक्कादायक खळबळ : सांगली- कोल्हापूर – सातारा सगळेच धक्क्यात..?

Admin by Admin
March 23, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सरकारी अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरचा मोठा कांड, धक्कादायक खळबळ : सांगली- कोल्हापूर – सातारा सगळेच धक्क्यात..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • कोल्हापूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश घालून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमधून समोर आला आहे. याप्रकरणी तोतया कर्मचाऱ्यास उत्पादन शुल्क विभागाने दारू साठ्यासह पकडले आहे.

गाडीवर शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागाने रंगेहाथ पकडलं आहे. याप्रकरणी तोतया नितीन ढेरे आणि निवृत्त लष्करी जवान शिवाजी धायगुडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून 2 लाख 51 हजारांची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी यांच्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाऱ्या चालकानेच दारू तस्करीचा धंदा सुरू केला होता. विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश परिधान करत लालबत्ती लावून त्याने ही तस्करी सुरू केली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये हा ड्रायव्हर रंगेहाथ सापडला आहे. गडहिंग्लज नेसरी रोडवर रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन ढेरे असं या चालकाचं नाव आहे. तसंच त्याच्याबरोबर निवृत्त लष्करी जवानही दारू तस्करी करताना सापडला आहे. अधिकाऱ्याच्या गाडीवर असलेल्या या ड्रायव्हरने नेमके एवढे धाडस केले कसे? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

Previous Post

ब्रेकिंग | शिंगणापूरच्या तरुणाचा धावत्‍या टेंपोतून पडून मृत्यू; गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील घटना

Next Post

ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड

ब्रेकिंग | सांगलीत करणी काढण्यासाठी होम-हवन करणारा भोंदूबाबा गजाआड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group