• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

अवैध वाळू तस्कराला प्रांताधिकाऱ्यांचा दणका

Admin by Admin
March 23, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • कडेगांव प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कडेगांव तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार यातील एकावर तीन आणि दुसऱ्यावर चार गुन्हे दाखल आहेत अशा दोघांना कडेगांवचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.यातील एक अवैध वाळू तस्कर असून प्रथमेश उर्फ हरजीत अशोक शेळके तर दुसरा गजानन शामराव वडार हा आहे. शेळके हा कुख्यात वाळू तस्कर असून त्याच्यावर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुन्हे अवैध वाळू तस्करीचे असून प्रांताधिकाऱ्यांचा हा संबंधित वाळू तस्कराला दणका मानला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जनतेच्या जिवीताची, मालमत्तेची होणारी हानी टाळण्यासाठी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश ऊर्फ हरजित अशोक शेळके (रा. वडियेरायबाग ता. कडेगाव) व गजानन शामराय वडार (रा. वांगी ता. कडेगाव) या दोघांना चिंचणी वांगी पोलीस ठाणेकडील प्रस्तावानुसार उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ नुसार सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून २ वर्षाच्या कालावधीकरीता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.

यातील प्रथमेश ऊर्फ हरजित अशोक शेळके याच्यावर ३ गुन्हे नोंद असून तिन्ही गुन्हे अवैध वाळू तस्करीचे आहेत तर गजानन शामराव वडार याच्यावर ४ गुन्ह्यांची नोंद आहे यामध्ये त्यावर भा द वि सं 323, 324, 307, 435, 504, 506 सारख्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

 

  • चिंचणी वांगी पोलीस ठाण्यांतर्गतच अवैध वाळू तस्करी जास्त

कडेगांव तालुक्यातील चिंचणी वांगी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातच अवैध वाळू तस्करी जास्त चालत असल्याचे वारंवार सिद्ध झालं आहे. वांगी, शेळकबाव आणि वडिये रायबाग या गावातून यंत्रांच्या सहाय्याने बेसुमार अवैध वाळू उपसा चालतो. अवैध वाळू तस्करांकडून शेतकऱ्यांना मारहाणीच्या घटना ही याच पोलीस ठाण्यांतर्गत घडल्याचे बोलले जाते.

 

  • हद्दपारीची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे

शेळके आणि वडार या दोघांना तीन जिल्ह्यातून हद्दपार केले असले तरी या हद्दपार कारवाईची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अन्यथा दिवसभर घरात लपून बसणे आणि रात्रभर येरळा नदीतून अवैध वाळू उपसा करणे हा रोजचा नित्यक्रम होऊन बसू नये अन्यथा ज्या कारणासाठी हद्दपार केलं आहे त्यालाच तिलांजली दिली जाईल असं जाणकार लोकांचे मत आहे.

Previous Post

अरेरे..! मटक्याचे हप्ते घेऊन पण कलेक्शन करणाऱ्या पोलिसाची बोंब, “माझी एकट्याचीच बुकी बंद का?” बुकी चालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

मोठी बातमी | लाडक्या बहिणीसाठी सरकारची आणखी एक खुशखबर! एसटी बस प्रवासात मिळणार सवलत.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | लाडक्या बहिणीसाठी सरकारची आणखी एक खुशखबर! एसटी बस प्रवासात मिळणार सवलत.!

मोठी बातमी | लाडक्या बहिणीसाठी सरकारची आणखी एक खुशखबर! एसटी बस प्रवासात मिळणार सवलत.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group