• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!

Admin by Admin
March 22, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय सह सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष 2023-24 साठीची निश्चित केलेली एकूण 25 पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज जाहीर केली.

याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

यंदाच्या [2023-24] वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून 103 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्र [41], उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू मधून [प्रत्येकी 12], हरियाणा [10], पंजाब [9] कर्नाटक [5] आणि मध्य प्रदेश व उत्तराखंडमधून प्रत्येकी एक कारखान्याने सहभाग घेतला होता.

पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला या गटात देशातील एकूण 58 सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण 45 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच “एका कारखान्याला एक पारितोषिक” असे धोरण ठरविण्यात आले. या दोन्ही धोरणांमुळे सर्व कारखान्यांच्या कामगिरी ला न्याय मिळतो. तसेच जास्तीत जास्त कारखान्यांना पारितोषिक मिळविता येतात.

पारितोषिकांचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय सह सचिव [सहकार] यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक – राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक – वसंतदादा साखर संस्था पुणे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश होता.

  • राष्ट्रीय पारितोषिकांचा तपशील

उच्च उतारा विभाग (High Sugar Recovery Area)

उत्कृष्ट ऊस उत्पादकता: (Sugarcane Development)

1) प्रथम श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि., जुन्नर, जि. पुणे (महाराष्ट्र)
2) द्वितीय: क्रांती अग्रणी डॉ. जी डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., कुंडल, जि. सांगली (महाराष्ट्र)
3) तृतीय श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग मंडळी लि., तहसील महुवा, जि. सुरत, (गुजरात)

तांत्रिक कार्यक्षमता : (Technical Efficiency)

4) प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., कराड, जि. सातारा, (महाराष्ट्र)
5) द्वितीय : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., पो. श्रीपूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र).
6) तृतीय : डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., पो. वांगी, जि. सांगली (महाराष्ट्र)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन: (Financial Management)

7) प्रथमः कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., जि. जालना, (महाराष्ट्र)
8) द्वितीय : श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि., पांडवाई, जि. भरूच, (गुजरात)
9) तृतीय श्री नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडली लि., ता. राजपिपला (नांदोड), जि. नर्मदा (गुजरात)

विक्रमी ऊस गाळप (Highest cane crushing)

10) प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

विक्रमी साखर उतारा (Highest Sugar Recovery)

11) प्रथम : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि., जि. कोल्हापूर, (महाराष्ट्र)

उच्च साखर उतारा विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (Overall Best Cooperative Sugar Factory)

12) श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., तालुका बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)

उर्वरित विभाग (Other Sugar Recovery Area)

उत्कृष्ट ऊस उत्पादकता (Sugarcane Development)

13) प्रथम : बुधेवाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. लुधियाना, (पंजाब)

14) द्वितीय : कल्लाकुरिची ॥ कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. विल्लूपुरम (तामिळनाडू)

15) तृतीय : किसान सहकारी चीनी मिल्स लि., पोवायं, जि. शहाजहांपूर, (उत्तर प्रदेश)

तांत्रिक कार्यक्षमता (Technical Efficiency)

16) प्रथम : करनाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. करनाल, (हरियाणा)

17) द्वितीय : चेय्यार कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., अंकावूर, जि. तिरुवन्नमलै, (तामिळनाडू)

18) तृतीय : किसान सहकारी चीनी मिल्स लि., सठिऔन, जि. आजमगढ़, (उत्तर प्रदेश)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन (Financial Management)

19) प्रथम : नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, नवलनगर., जि. बुरहणपूर (मध्य प्रदेश)

20) द्वितीय : चेंगलरायन कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., थिरुवेनैनाल्लूर, जि. विल्लूपुरम, (तामिळनाडू)

21) तृतीय : धर्मापुरी डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., थैमानहळ्ळ्ळी, जि. धर्मापुरी (तामिळनाडू)

विक्रमी ऊस गाळप (Highest Cane Crushing)

22) प्रथम : रमाला सहकारी चीनी मिल्स लि., रमाला बरूत, जि. बागपत (उत्तर प्रदेश)

विक्रमी साखर उतारा (Highest Sugar Recovery)

23) प्रथम : किसान सहकारी चीनी मिल्स लि., गजरौला जि. अमरोहा, बागपत (उत्तर प्रदेश)

उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (Overall Best Cooperative Sugar Factory)

24) सुब्रमनिया शिवा कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., गोपालापूरम, जि. धर्मापुरी (तामिळनाडू)

  • संपूर्ण भारतातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्यासाठीचा प्रतिष्ठित वसंतदादा पाटील पुरस्कार

25) यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे (महाराष्ट्र) यांना मिळाले आहे.

एकूण 25 पारितोषिकात महाराष्ट्र ने एकूण 10 पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला 5 पारितोषिके प्राप्त झाली आहेत. उत्तर प्रदेशने 4, पारितोषिकांसह तिसरा क्रमांक पटकाविला तर गुजरात ने 3 पारितोषिकात सह चौथा क्रमांक मिळवला असून पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक

Next Post

अरेरे..! मटक्याचे हप्ते घेऊन पण कलेक्शन करणाऱ्या पोलिसाची बोंब, “माझी एकट्याचीच बुकी बंद का?” बुकी चालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

अरेरे..! मटक्याचे हप्ते घेऊन पण कलेक्शन करणाऱ्या पोलिसाची बोंब, "माझी एकट्याचीच बुकी बंद का?" बुकी चालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group