• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक

Admin by Admin
March 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

रत्नागिरीकडे गांजा घेऊन निघालेल्या सत्यजित सदाशिव जाधव (वय ३४, रा.विकासनगर, इचलकरंजी) याला स्थानिक गुन्हे शाखेने आज सकाळी पकडले. त्याच्याकडून नऊ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी तो बसमधून प्रवास करीत होता; मात्र, पोलिसांनी बस अडवून गांजासह त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित जाधव लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने सध्या बेरोजगार होता. तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच तो गांजा घेऊन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती अंमलदार सागर चौगले यांना समजली. त्यांनी पोलिस निरीक्षक कळमकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी एक पथक सांगली फाट्याजवळ तैनात केले होते.

  • बस अडवून गांजा पकडला…

रत्नागिरीला गांजा पोहोचविण्यासाठी जाधवने बसचा सुरक्षित मार्ग निवडला होता. जाधव इचलकरंजीतून एका बसमध्ये बसला. तो सांगली फाट्यावरून पुढे जाणार असल्याने पथकाने याच ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून नऊ किलो गांजा व इतर साहित्य असा दोन लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

  • ओरिसावरून आणला गांजा…

जाधव याने गांजा कोठून आणला, याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याने ओरिसा येथे जाऊन गांजा आणल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्याकडे बसची तिकिटेही मिळाली असून, त्याला गांजा देणाऱ्यांचा शोध आता घेण्यात येणार आहे. गांजा विक्रीच्या मुळापर्यंत जाणार असल्याचेही कळमकर यांनी स्पष्ट केले.

Previous Post

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता, हॉटेलचालकाविरूद्ध एफ आय आर 

Next Post

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group