• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता, हॉटेलचालकाविरूद्ध एफ आय आर 

Admin by Admin
March 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियानांतर्गत टाकलेल्या धाडसत्रामध्ये इस्लामपूर येथील हॉटेल शंकरा, आष्टा नाका येथून एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता करण्यात आली असून, सदर आस्थापना मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.) नोंदवण्यात आल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ व सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.

संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.), भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.), २०२३ कलम १४६ व अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ कलम ७९ अंतर्गत दाखल करण्यात आला. तद्‌नंतर सदर किशोरवयीन कामगारास सुरक्षिततेकरिता दादुकाका भिडे, मुलांचे बालगृह येथे दाखल करण्यात आले.

दुकाने निरीक्षक चंद्रकांत साळुंखे यांच्या नेतृत्त्वात यांचे नेतृत्वात जिल्हा चाईल्ड लाईनच्या समुपदेशक श्रीमती प्रियांका माने, जिल्हा परिषदेचे समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण) जिल्हा समन्वयक प्रशांत शेटे, होमगार्डचे वरिष्ठ पलटण नायक महादेव देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. यु. आर. जुगळे यांनी ही संयुक्त कार्यवाही केली.

14 वर्षापेक्षा कमी वयातील बालकास कोणीही आस्थापनेत कामावर ठेऊ नये. तसेच 14 ते 18 वर्षादरम्यानच्या किशोरवयीन कामगारास कोणत्याही धोकादायक आस्थापनेत कामाला ठेऊ नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सांगली बाजार समितीचे त्रिभाजन तातडीने करावे; ‘या’ भाजप नेत्याची मंत्री रावल, फडणवीस यांच्याकडे मागणी

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक

मोठी ब्रेकिंग | सांगली फाट्यावर ९ किलो गांजा जप्त, एकास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group