• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरजेतील पुलाखाली गुटख्याचा टेम्पो आला अन् पुढे निघाला..गुटखा तस्करांच्या पिकअपची धडक; तरुणाचा मृत्यू

Admin by Admin
March 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मिरजेतील पुलाखाली गुटख्याचा टेम्पो आला अन् पुढे निघाला..गुटखा तस्करांच्या पिकअपची धडक; तरुणाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावर गुटखा तस्करी करणार्‍या पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

जीवन गोपाळ येळपल्ले (वय 25, रा. अथणी, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेली तरुणी प्रणाली औदुंबर सुतार (वय 24, रा. कोंढवा, पुणे) ही गंभीर जखमी झाली आहे.

अपघातग्रस्त पिकअपमधून पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी पिकअप चालक विकास वसंत जाधव (रा. कोडोली, जि. सातारा) याला अटक केली आहे. बुधवारी (दि. 23) रात्री उशिरा ही घटना घडली. जीवन आणि प्रणाली हे दोघे कोंढवा (पुणे) येथे राहत होते. बुधवारी रात्री ते प्रणालीच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून (एमएच 12 डब्ल्यूसी 9591) कवठेमहांकाळकडे निघाले होते. त्यांची दुचाकी तासगाव हद्दीतील लांडघोळ मळा येथे आली असता, समोरून येणार्‍या पिकअपने (एमएच 11 डीडी 0152) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात जीवन आणि प्रणाली दुचाकीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जीवन याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रणाली गंभीर जखमी झाली.

दरम्यान, पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता, त्यात 1 लाख 55 हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. चालक विकास जाधव याने गुटखा पिकअपच्या हौद्यात लपवून आणला होता. पांढर्‍या रंगाच्या सात पोत्यांमध्ये गुटखा भरून त्यावर जनावरांसाठी लागणारा भुसा ठेवला होता. अपघातानंतर पोलिसांकडून पकडले जाऊ नये म्हणून त्याने गुटख्याची पोती रस्त्यावर फेकून दिली आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीची पिकअप आणि दीड लाख रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा साठा जप्त केला आहे. गुटखा तस्करीप्रकरणी हवालदार अरविंद संकपाळ यांनी विकास जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

  • गुटख्याचे कर्नाटक कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, हा गुटखा कर्नाटक भागातून आणला होता. विकास जाधव याने मिरजजवळील एका पुलाखाली कर्नाटकहून आलेल्या टेम्पोतून गुटखा आणला. तो सातारा जिल्ह्यातील तळबीड येथे पोहोचवणार होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.

Previous Post

सांगली ब्रेकींग | आयुक्त बंगल्याशेजारी भरदुपारी आग, विझवण्यासाठी प्रयत्न सुरू..!

Next Post

मोठी बातमी | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा : सांगली जिल्ह्यातील महसूलमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोठा दणका, चुकीचे काम करणाऱ्यांवर होणार कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

मोठी बातमी | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा : सांगली जिल्ह्यातील महसूलमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोठा दणका, चुकीचे काम करणाऱ्यांवर होणार कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group