- सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली शहरातून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत भरदुपारी मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले. आयुक्त बंगल्यापासून काही मीटर अंतरावर न्यू प्राइड चित्रपटगृहाच्या समोर असणाऱ्या झाडीत ही आग लागल्याची घटना समोर आली.
भर उन्हात मोठी आग लागल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य परिस्थितीत आग आटोक्यात आल्याचे समजते आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही.

