• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पैसे का मागितले, या कारणावरून भावाने सख्ख्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. कोंत्येवबोबलाद येथे ही घटना घडली. आमसिद्ध रामू यरनाळ (वय 27) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे.

मारहाणीची ही घटना सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, मंगळवारी सकाळी खून झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आमसिद्धचा भाऊ प्रवीण रामू यरनाळ (वय 25) याच्यावर उमदी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची फिर्याद ललिता रामू यरनाळ यांनी उमदी पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आमसिद्ध यरनाळ यास दारूचे व्यसन होते. तो व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता. त्यातून घरात वारंवार भांडणे होत असत सोमवारी रात्री याच कारणावरून लहान भाऊ प्रवीण याच्याशी त्याचे भांडण झाले. प्रवीणने सततच्या भांडणाला वैतागून आमसिद्धच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर रात्री सगळे झोपले. मात्र सकाळी 6 वाजता आमसिद्ध उठला नाही. कुटुंबीयांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे पोहोचले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी म्हटले आहे. यामुळे प्रवीण यरनाळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

  • आमसिद्धने आई-वडिलांनाही केली होती मारहाण

आमसिद्ध अविवाहित होता. संशयित प्रवीण यरनाळही अविवाहित आहे. आमसिद्धला दारूचे व्यसन होते. यातून त्याचे घरात सर्वांशी खटके उडायचे. अशातच आमसिद्धने, लग्न का लावून देत नाही?, असे म्हणत 19 ऑक्टोबर 2023 रोजी वडिलांना मारहाण केली होती. तसेच आई व भावालाही मारहाण केली होती.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!

Next Post

ब्रेकिंग | ‘त्या’ सेतूची तपासणी सुरू, तहसीलदारांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

ब्रेकिंग | 'त्या' सेतूची तपासणी सुरू, तहसीलदारांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group