• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ‘त्या’ सेतूची तपासणी सुरू, तहसीलदारांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्रात एका विद्यार्थिनीच्या गॅप सर्टिफिकेटच्या प्रतिज्ञापत्रावर चक्क तहसीलदारांची बोगस सही करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार साप्ताहिक ‘जनतांडव’ने चव्हाट्यावर आणला. याप्रकरणी सेतू चालक दीपक सरगर याला नोटीस काढली आहे. शिवाय सेतूची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.

कुमठे (ता. तासगाव) येथील मृणाली महादेव पाटील या विद्यार्थिनीने गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र केले होते. तिला तात्काळ गॅप सर्टिफिकेट हवे होते. त्याचाच गैरफायदा घेत सेतू चालक दीपक सरगर याने जादा पैशाच्या हव्यासापोटी प्रतिज्ञापत्रावर चक्क तहसीलदारांची बोगस सही ठोकली. शिवाय हे प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयातील रजिस्टरला नोंदवलेही नाही.

दरम्यान, आपल्या पुढील शैक्षणिक कामासाठी संबंधित विद्यार्थिनीने हे गॅप सर्टिफिकेट एका महाविद्यालयात दिले. मात्र संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांना सर्टिफिकेटवरील तहसीलदारांची सही बोगस असल्याची शंका आली. त्यांनी या सहीबाबत चौकशी सुरू केली.

या प्रतिज्ञापत्रावर तहसीलदारांची सही बोगस असल्याची तक्रार येथील तहसील कार्यालयामध्ये दाखल झाली आहे. या तक्रारीची तहसीलदार अतुल पाटोळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्राचा चालक दीपक सरगर याला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

याप्रकरणी सरगर याच्याकडून याबाबतीत खुलासाही घेण्यात आला आहे. शिवाय या सेतूची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यामार्फत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!

Next Post

धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!

धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group