• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!

Admin by Admin
March 17, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करणार्‍या एका बांग्लादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे अमीर शेख या नावाने तो शहरातील एका लॉजवर राहत होता.

त्याचे मूळ नाव एम. डी. अमीर हुसेन (वय 62, रा. उत्तर आबादोर, मोहम्मदपूर, ढाका, बांग्लादेश) असे आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह योगेश सदामते, रवी कोरे, प्रदीप सावंत, संदीप पाटील यांचे पथक गस्तीवर होते. रविवारी सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना मिळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव अमीर शेख असून दिल्लीतील रहिवासी असल्याचे सांगितले. आपले आधार कार्डही दाखवले. त्यावर एबीसी नजदीक आंबेडकर चौक, मुनरीका गाव, जेएनयू, दक्षिण-पश्चिम दिल्ली, असा पत्ता होता. परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने आपण बांग्लादेशातील ढाक्का येथील असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीररित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय त्याने भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक, फोर्जरीसह कलम 3 (अ), 6 (अ), पारपत्र अधिनियम (भारतामध्ये प्रवेश) 1950, कलम 14अ (ब), परकीय नागरिक आदेश 1948 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे.

  • कोलकत्ता, पुणे मार्गे सांगलीत

बांग्लादेशी नागरिक अमीर हुसेन हा त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून 13 मार्चरोजी विमानाने कोलकात्ता येथे आला. तेथून तो पुण्यात आला. शिवाजीनगर बस स्थानकातून तो सांगलीस आला. सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील विशाल लॉज येथे तो राहत होता. त्याच्या मोबाईलमध्ये बंगाली भाषेचा वापर व 880 आयएसडी कोड असलेले मोबाईल व लँड लाईन नंबर पोलिसांना आढळून आले आहेत.

  • राजकीय पक्षाशी संबंध

घुसखोर अमीर हुसेन हा बांग्लादेशातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थैर्यामुळे तो घुसखोरी करून भारतात आला आहे. सांगलीत तो एका लॉजवर मुक्कामास होता. पण रात्रीच्या वेळी तो शहरात का फिरत होता, यामागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास शहर पोलिस करीत असल्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Previous Post

धक्कादायक ब्रेकींग – सांगली पुन्हा हादरली | म्हाताऱ्याने ८ वर्षाच्या शाळकरी मुलीवर केला अत्याचार, मिरजेत गुन्हा दाखल..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!

मोठी ब्रेकिंग | खून करून सततचे वादंग संपवले, पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group