• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक ब्रेकींग – सांगली पुन्हा हादरली | म्हाताऱ्याने ८ वर्षाच्या शाळकरी मुलीवर केला अत्याचार, मिरजेत गुन्हा दाखल..!

Admin by Admin
March 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
धक्कादायक ब्रेकींग – सांगली पुन्हा हादरली | म्हाताऱ्याने ८ वर्षाच्या शाळकरी मुलीवर केला अत्याचार, मिरजेत गुन्हा दाखल..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या – मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे या नराधमाचे नाव आहे.

ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत पीडितेच्या आजीने शनिवारी (दि.१५) ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम सुभाष कांबळे याला अटक केली असून त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीला एका ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे. ते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे. संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून २६ फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती. संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलवून घेतले. तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता घरी गेली. तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली. पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले. परंतू अधिकचा त्रास होवू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. ग्रामीण पोलिसांनी नराधम कांबळे याला अटक केली. त्याच्याविरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे करत आहेत.

मुलींची सुरक्षितता ऐरणीवर

काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आले. जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

तेच तेच चेहरे टाळून तरुणांना यापुढे संधी : आ. जयंत पाटील

Next Post

ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!

ब्रेकिंग | सांगलीत रात्रीच्या वेळी फिरायचा, लॉजवर मुक्काम करायचा, कोडवर्क भाषा बंगाली, राजकीय कनेक्शन अन् टार्गेट सांगली..? पोलिसांनी केली अटक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group