• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!

Admin by Admin
March 9, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एकूण सात शस्त्रक्रियागृहे कार्यरत आहेत. त्यापैकी पाच शस्त्रक्रियागृहांचे नूतनीकरण करण्याचे काम सोमवार, दि. १० मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.

त्याकरिता अंदाजे सहा महिने इतका कालावधी लागणार आहे. या कालावधीत या रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया बंद राहतील, असे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागांतील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. पाच शस्त्रक्रिया विभागांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे या पाच विभागांतील शस्त्रक्रिया विभाग सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

या ठिकाणच्या नियमित शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरू राहतील. तातडीच्या शस्त्रक्रिया नेहमीप्रमाणे वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील दोन शस्त्रक्रियागृहात सुरू राहतील, असे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांकडून दिवसभरात ४३७ तक्रारींचे निराकरण, तक्रारदारातून समाधान व्यक्त..!

Next Post

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लढ्याला यश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लढ्याला यश

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लढ्याला यश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group