• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांकडून दिवसभरात ४३७ तक्रारींचे निराकरण, तक्रारदारातून समाधान व्यक्त..!

Admin by Admin
March 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांकडून दिवसभरात ४३७ तक्रारींचे निराकरण, तक्रारदारातून समाधान व्यक्त..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यात बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात. परंतु, काही ठिकाणी तक्रारींचे निरसन होत नाही. हेलपाटे घालून नागरिक वैतागले तरी त्यांची दखल घेतली जात नाही. ‘शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये,’ असे म्हटले जाते. परंतु पोलिस ठाण्यातही नागरिकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण केले जाते, असा सुखद अनुभव घेता येतो.याचे ताजे उदाहरण म्हणजे तक्रार निवारण दिनात चक्क पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जत पोलिस ठाण्यात हजर राहून २० तक्रारींचे जागेवर निराकरण केले.

पोलिस ठाणेस्तरावर आणि उपविभागात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. यामध्ये नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण केले जाते. शनिवारी, दि. ८ रोजी तक्रार निवारण दिनात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वत: जत पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तक्रारीबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिकारी व अंमलदार यांना जागेवर आदेश दिले. त्यांनी जागेवर २० तक्रारींचे निराकरण केले.अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी शहर पोलिस ठाण्यात हजर राहून २४ तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देऊन तक्रारींचे निराकरण केले.

जिल्ह्यात दिवसभरात सांगली शहर उपविभागात १४९ तक्रारींचे, मिरज उपविभागात ४४, तासगाव उपविभागात ४४, विटा उपविभागात २२, इस्लामपूर उपविभागात १०३ आणि जत उपविभागात ७५, अशा एकूण ४३७ तक्रारींचा दिवसभरात निपटारा करण्यात आला. स्वत: वरिष्ठ अधिकारी पोलिस ठाण्यात येऊन तक्रारी ऐकून घेतल्यामुळे तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला. तसेच पोलिस अधिकारी व अंमलदार यांनीही दिलेल्या आदेशाप्रमाणे तातडीने अंमलबजावणी करत तक्रारींचा निपटारा केला.

प्रत्येक शनिवारी पोलिस ठाणे आणि उपविभागीय कार्यालयस्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. नागरिकांच्या तक्रारींचे यामध्ये निराकरण केले जाते. त्यामुळे पोलिस ठाण्यांशी संबंधित असलेल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे.
– संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अपहार, चार वर्षांपासून प्रकार सुरु

Next Post

ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!

ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group