• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | मिरजेतील महिलेला तब्बल साडेदहा लाखांचा दंड

Admin by Admin
March 4, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी – मिरजेतील महिलेला १० महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल १० लाख ६५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. फरजाना शहाबुद्दीन पीरखान (रा. किल्ला भाग, मिरज) असे तिचे नाव आहे.

सांगली येथील आठवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभांगी नलवडे यांनी सोमवारी (दि. ३) हा निकाल दिला.

खटल्याची माहिती अशी : महेश फिरोजी खोत यांनी मिरजेतील गुलमोहर कॉलनीत मनीषा अपार्टमेंटमध्ये सदनिका खरेदीसाठी फरजाना पीरखान यांच्यासोबत करार केला होता. त्यासाठी अनामत स्वरुपात काही रक्कम फरजाना यांना दिली होती. कालांतराने काही कारणांनी हा करार रद्द झाला. त्यामुळे फरजाना यांनी ही सदनिका अन्य ग्राहकाला विकली. करार रद्द झाल्याने खोत यांना पैशांची परतफेड व नुकसान भरपाईपोटी ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी फरजाना यांनी खोत यांना धनादेश दिला.

पण हा धनादेश बॅंकेतून न वटता परत आला. खोत यांनी फरजाना यांच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा करुनही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दाव्याचा निर्णय देताना न्यायालयाने फरजाना यांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा ठोठावली. खोत यांच्यावतीने ॲड. चिराग सोनेचा यांनी काम पाहिले.

Previous Post

ब्रम्हनाळ सोसायटीच्या चेअरमन पदी बंडगर तर व्हाईस चेअरमनपदी विभुते यांची निवड.

Next Post

ब्रेकींग | भाच्याचा डोक्यात दगड घालून केले खल्लास; मामासह मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, थेट मानेवर, गालावर अन हातावर ब्लेडने हल्ला..!

ब्रेकींग | भाच्याचा डोक्यात दगड घालून केले खल्लास; मामासह मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group