• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | भाच्याचा डोक्यात दगड घालून केले खल्लास; मामासह मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

Admin by Admin
March 4, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, थेट मानेवर, गालावर अन हातावर ब्लेडने हल्ला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड प्रतिनिधी | नेहमीच विविध घटनांसाठी धगधगते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुपवाड शहरातील उपनगरात नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून राहूल आप्पासाहेब सुर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक. सध्या रा.प्रकाशनगर गल्ली नं ३, कुपवाड) या तरुणाचा मामा व त्याच्या मुलाने डोक्यात दगड घालून निर्घून खून केला.

मयत युवक

ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (२२, दोघेही रा.प्रकाशनगर गल्ली नं.३,कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहूल सुर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई व भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यापूर्वी राहूल सुर्यवंशी हा कामानिमीत्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीत काम करीत होता.आज (मंगळवारी) सुट्टी असल्याने तो घरी एकटाच होता. राहूल सुर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होता. पिडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी राहूल याला वेळोवेळी समज दिली होती. तरीही तो ऐकत नव्हता.

मंगळवारी दुपारी राहूल सुर्यवंशी याने पिडित मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईक असलेला त्याचा मामा संदीप सावंत व मुलगा सौरभ सावंत याच्या निदर्शनास आला. संशयित सौरभ सावंत याचा राग अनावर झाला. सौरभ याने रागाच्या भरात सुर्यवंशी याला पकडून मारहाण केली. तर संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला. संशयित सौरभ याने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. राहूल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहूलला त्यांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर संशयित आरोपी सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, गृह विभागाच्या उप अधीक्षक एम. विमला यांनी घटनास्थळी भेट दिली.

Previous Post

ब्रेकींग | मिरजेतील महिलेला तब्बल साडेदहा लाखांचा दंड

Next Post

मोठी बातमी | पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा ‘हा’ चेहरा चर्चेत..? महिलेला नग्न फोटो पाठवणाऱ्या मंत्र्यावर सरकार कारवाई करणार का? संतप्त महिलेचा उपोषणाचा इशारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

मोठी बातमी | पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा 'हा' चेहरा चर्चेत..? महिलेला नग्न फोटो पाठवणाऱ्या मंत्र्यावर सरकार कारवाई करणार का? संतप्त महिलेचा उपोषणाचा इशारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group