• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत रात्रीचं केलं असं काम, निसर्गविरोधी कृत्यानं बदनाम..! महापालिकेकडून पोलिसात तक्रार

Admin by Admin
March 1, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत रात्रीचं केलं असं काम, निसर्गविरोधी कृत्यानं बदनाम..! महापालिकेकडून पोलिसात तक्रार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • मिरज – खास प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या 

मिरज शहरात मिरज हायस्कूल समोरील एका व्यापारी संकुलासमोर असलेले सुमारे ३५ ते ४० वर्ष जुने गुलमोहराचे झाड रात्रीच्या वेळी तोडण्यात आल्याची घटना घडली आहे. मिरज सुधार समितीने ही बाब शुक्रवारी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर महापालिकेकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. सायंकाळी उशिरा या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. येथील रस्त्याकडेला असलेले मोठे झाड तोडून रात्रीच्या वेळी गायब केल्याने मिरजेतील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत मिरज सुधार समितीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मिरज हायस्कूल जवळील व्यापारी संकुलासमोर हे गुलमोराचे झाड होते. या झाडाचा येथील दुकानांना अडसर होत असल्याने येथील काही दुकानदार हे झाड काढण्यासाठी आग्रही होते, असाही आरोप सुधार समितीकडून करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री नंतर हे झाड तोडून नेण्यात आले आहे. तोडलेल्या झाडाचा बुंधा दिसू नये म्हणून त्यावर खडी ओतण्यात आली होती. याची माहिती मिळताच मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, संतोष जेडगे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी आदी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका उपायुक्त विजया यादव आणि पोलिस निरीक्षक किरण रासकर यांची भेट घेतली.

झाडाची कत्तल करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या वृक्ष विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. संबंधितांनी रात्रीच्या वेळी झाड तोडून झाडाच्या फांद्या, बुंधा व पाने येथून गायब केली आहेत. येथील वृक्ष बेकायदेशीर रित्या तोडून नेल्याप्रकरणी महापालिकेकडून मिरज शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. अशा प्रकारे रात्रीच्या वेळी बेकायदेशीर रित्या वृक्षतोडक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीसह नागरिकांमधून होत आहे.

Previous Post

बेडगेत आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळ ; मिरजेत उपचारासाठी केले दाखल

Next Post

मोठी बातमी | तासगावात ‘देवस्थान ईनाम’ची जमीन हडपली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

मोठी बातमी | तासगावात 'देवस्थान ईनाम'ची जमीन हडपली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group