• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | तासगावात ‘देवस्थान ईनाम’ची जमीन हडपली

धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता साडेपाच एकरावर डल्ला : ईनाम पत्रकावर खाडाखोड

Admin by Admin
March 1, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : गोपनीय खबऱ्या प्रतिनिधी 

तासगाव येथील एकाने सिद्धेश्वर देवस्थानची ईनाम जमीन हडपल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. तासगाव – विटा रोडला रस्त्यालगत असणारी सुमारे साडेपाच एकर जमीन संबंधिताने घशात घातली आहे. ही जमीन बळकावताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली नाही. तर ईनाम पत्रकात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडाखोड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी : तासगावात जमिनी बळकावणारी टोळी तयार झाली आहे. ‘लिटीगेशन’मधील जमिनी कमी दरात घशात घालून या टोळीने कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. अनेक बोगस कागदपत्रे तयार करून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या टोळीने काळ्याचं पांढरं केलं आहे. या टोळीने गोरगरीब, शोषित, वंचित घटकांच्या जमिनी घशात घालतानाच देवस्थान ईनामच्या जमिनीही सोडल्या नाहीत.

येथील एकाला ‘लिटीगेशन’मधील जमीन खरेदी करायची खोड आहे. जमिनी बळकावून स्वतःच्या ‘वैभवा’त भर घालणाऱ्या संबंधिताने काही वर्षांपूर्वी तासगाव – विटा रोडलगत असणारी सिद्धेश्वर देवस्थानची जमीन बळकावली आहे. बळकावलेल्या जमिनीतून स्वतःचे ‘वैभव’ वाढवण्यासाठी संबंधिताने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरले. ईनाम पत्रकावर खाडाखोड करून संबंधित साडेपाच एकरचा गट गायब केला. शिवाय तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांकडे बोगस कागदपत्रे सादर केली.

या प्रॉपर्टीची चक्क दोन बोगस खरेदीपत्रे झाली आहेत. धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता महसूल राज्यमंत्र्यांचा आदेश फाट्यावर मारून ही जमीन भोगवटदार वर्ग – 1 केली आहे. याकामी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनीही स्वतःचे खिसे गरम करून अनेकठिकाणी सरकारी कागदपत्रांवर खाडाखोड करण्याचे धाडस दाखवले आहे.

याशिवाय 2 डिसेंबर 2010 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान जमिनीच्या वहिवाटदारांची नावे कब्जेदार सदरातून इतर हक्कात घ्यावीत, असे आदेश दिले होते. या प्रॉपर्टीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अमंलबजावणी आजतागायत झाली नाही. परिणामी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून संबंधिताने कोट्यवधी रुपयांची जमीन लीलया बळकावली आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता एका तक्रारदाराने सर्व जुनी कागदपत्रे काढली आहेत. या कागदपत्रांमध्ये अनेक ठिकाणी खाडाखोड, त्रुटी दिसून येत आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात देवस्थान जमीन बळकावण्याचा हा काळा बाजार चव्हाट्यावर येणार आहे. परिणामी संबंधिताने देवस्थानची जमीन हडप करून मिळवलेले ‘वैभव’ टिकणार की या प्रकरणातील बोफोर्स चव्हाट्यावर येणार, याचे उत्तर येणार काळच देणार आहे.

Previous Post

मिरजेत रात्रीचं केलं असं काम, निसर्गविरोधी कृत्यानं बदनाम..! महापालिकेकडून पोलिसात तक्रार

Next Post

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group