Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | सांगलीतील ‘या’ नेत्याच्या घरावर रात्री हल्ला..!

Admin by Admin
February 23, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

 

  • ऑर्केस्ट्रा बंद केल्याच्या संशयावरून घरावर दगडफेक करीत जोरदार हल्ला..

सांगली प्रतिनिधी | कवठेपिरान (ता. मिरज) येथील यात्रेत ऑर्केस्ट्रा बंद केल्याच्या संशयावरून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांच्या घरात घुसून जमावाने हल्ला केला. यावेळी दोन मोटारीवर दगडफेक करण्यात आली.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांना हुसकावून लावले. या घटनेनंतर गावात तणाव आहे. याप्रकरणी तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शुभम कृष्णात पाटील (वय 27), मनोहर पिराजी यादव(47), जालिंदर विठ्ठल दिंडे (44), जयराज राजाराम साळुंखे (29), रणजित रंगराव पाटील (30), प्रकाश बाबुराव दिंडे (34), किरण किसन पाटील (31), कपिल शिवाजी किर्ते (38), रोहित नारायण पाटील (35), पवनकुमार राजेंद्र साळुंखे (22), ईस्माईल शब्बीर सय्यद (28), लियाकत शौकत पिंजारी (41) व अरुण भीमराव साळुंखे (46, सर्व रा. कवठेपिरान, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कवठेपिरान येथे सप्तर्षी (सात सय्यद) यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात एका गटाने ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. पोलिसांनी रात्री दहापर्यंत कार्यक्रमाला परवानगी दिली होती. पण रात्री दहानंतरही ऑर्केस्ट्रा सुरू होता. याबाबत काही गावकर्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले व पथकाने धाव घेत ऑर्केस्ट्रा बंद केला. पोलिसांनी शासन आदेशानुसार रात्री दहानंतर कार्यक्रम सुरू ठेवता येणार नसल्याचे समजावून सांगितले. ऑर्केस्ट्राबाबत तक्रार केल्याच्या संशयावरून शुभम पाटील व 15 ते 20 जणांचा जमाव भीमराव माने यांच्या घरावर चाल करून गेला. ऑर्केस्ट्रा बंद करण्यास मानेच जबाबदार असल्याच्या समजातून ‘त्यांना सोडायचे नाही’, असे म्हणत जमाव त्यांच्या घरात घुसला. काहींनी घराच्या दरवाजाला लाथा मारल्या. एकाने त्यांच्या मोटारींवर (एमएच 10, सीएन 7333 व एमएच 10 ईई 567) दगडफेक केली. यात वाहनांचे नुकसान झाले. रात्री पावणे बाराच्या सुमारास हा धुडगूस सुरू होता. पोलिस निरीक्षक चौगले व पथकाने धाव घेत जमावास पांगवण्यास सुरुवात केली. जमाव आक्रमक होताच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. या घटनेमुळे रात्री गावात तणावाचे वातावरण होते. ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रात्री पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सकाळी हे फुटेज तपासून संशयितांवर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी सहायक निरीक्षक लक्ष्मण जाधव यांनी शुभम पाटील याच्यासह 13 जणांविरोधात फिर्याद दिली आहे. सर्व संशयितांना पोलिस ठाण्यात आणून कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी सकाळी दुसर्‍या गटानेही वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अद्याप नोंद झालेली नाही. संबंधिताची तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे निरीक्षक चौगुले यांनी सांगितले.

Previous Post

मिरज ब्रेकींग | मोटारीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह दुचाकीवरील पती-पत्नी ठार, ऊसतोड मजूर गावी जाताना अपघात

Next Post

धक्कादायक ब्रेकींग | मिरजेत तलवारीने गुन्हेगारास भोकसले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक ब्रेकींग | मिरजेत तलवारीने गुन्हेगारास भोकसले

धक्कादायक ब्रेकींग | मिरजेत तलवारीने गुन्हेगारास भोकसले

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014