• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान

Admin by Admin
February 13, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कळंबा येथील साई मंदिरनजीक असणार्‍या श्रद्धा दवाखाना आणि वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे बुधवारी पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

श्रद्धा दवाखान्याच्या डॉ. दीपाली सुभाष ताईगडे (46) यांच्यासह गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणार्‍या सुप्रिया संतोष माने (42, रा. रायगड कॉलनी कळंबा), धनश्री अरुण भोसले (30, शिंगणापूर, ता. करवीर) या तिघींना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • डमी रुग्णाद्वारे कारवाई…

कळंबा येथील दवाखान्यासह ठिकठिकाणी गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने डमी रुग्ण तयार करून कारवाई केली. बुधवारी (दि. 12) सकाळी आठ वाजल्यापासून कळंबा येथून सुरुवात झाली. विशेष म्हणजे अधिकार्‍यांनी शासकीय वाहनांचा वापर न करता दुचाकीवरून जाऊन ही कारवाई केली. यानंतर वरणगे पाडळी येथे गर्भपाताच्या गोळ्या विक्रीसाठी गेलेल्या एजंट माने, भोसले या दोन महिलांना छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेते. विशेष गोपनीयता ठेवल्याने संशयितांना काहीही कल्पना न येता गर्भलिंग निदानाच्या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पथकाला यश आले.

  • 30 हजारांत गर्भलिंग निदान अन् गर्भपात…

गेल्या चार महिन्यांपासून डॉ. दीपाली ताईगडे यांचे कळंबा येथे हॉस्पिटल सुरू होते. येथेच त्यांनी गर्भलिंग तपासणी व गोळ्या देण्याचा धंदा सुरू केला होता. 30 हजारांत गर्भलिंग निदान आणि प्रसंगी गर्भपात केला जात होता. यामध्ये त्यांनी काही महिला एजंट ठेवले होते. त्यांच्या मार्फत येथे गर्भवती महिला गर्भलिंग तपासणी व गोळ्यासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागला मिळाली होती. यानंतर आरोग्य विभागाने श्रद्धा हॉस्पिटलवर विशेष पाळत ठेवली होती. गर्भलिंग तपासणीसाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी उपकरण वापरले जात होते. मात्र कारवाईची कुणकुण लागताच सोनोग्राफी मशिन आणणारा व्यक्ती पसार झाली. पोलिस त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेत होते.

  • गर्भपाताच्या गोळ्या घरपोच…

माने व भोसले या आवश्यकतेनुसार रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या घरपोच देत होत्या. गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांना त्या घरी जाऊन प्रत्येक पॅकेटला पाच हजार याप्रमाणे गोळ्या देत होत्या. आरोग्य विभाग अधिकारी व पोलिसांनी डमी रुग्ण तयार करून त्यांना वरणगे पाडळी येथे बोलावून घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गर्भपाताच्या गोळ्या विकत घेतल्या. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्या दोघी गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणत होत्या याचा शोध पोलिस घेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, आरोग्य पथक आणि करवीर पोलिसांनी अवैध गर्भलिंग निदान करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Previous Post

सांगलीतील मंडळ अधिकाऱ्याने घेतली पन्हाळ्यात लाच, पंटरसह तिघांना घेतले ताब्यात..

Next Post

विट्यात दोन पत्रकारांवर हल्ला..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेकडून पत्रकारांचा अपमान.? किंमत फक्त २०० रुपये..?

विट्यात दोन पत्रकारांवर हल्ला..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group