• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विट्यात दोन पत्रकारांवर हल्ला..

Admin by Admin
February 13, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेकडून पत्रकारांचा अपमान.? किंमत फक्त २०० रुपये..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा प्रतिनिधी | यूट्यूबवर बातमी प्रसारित करण्याच्या वादातून येथे यूट्यूबच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ल्या करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. प्रसाद प्रकाश पिसाळ (वय 33) आणि सुषमा विजयकुमार जोशी अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत.पिसाळ गंभीर जखमी आहेत.

याप्रकरणी विटा पोलिसांनी विट्यातील राहुल जाधव, सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत यांच्यासह लेंगरेतील सुनील पवार या चार जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 109, 3 (5) आणि शस्त्र अधिनियम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सर्वजण अंदाजे 25 ते 30 या वयोगटातील आहेत. याबाबत पिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.

विटा पोलिसांनी सांगितले की, पिसाळ विटा मायणी रस्त्यावरील कार्यालयात असताना मंगळवारी रात्री राहुल, सुनील, सागर व विनोद तेथे आले. राहुलने कोयत्यासारख्या घातक शस्त्राने आणि सुनीलने स्टिलच्या रॉडने पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर, पाठीवर, पायावर हल्ला केला. त्याचवेळी प्रसाद यांना सोडवण्यास आलेल्या सुषमा यांनाही मारहाण केली. यावेळी आजूबाजूचे लोक गोळा झाल्यामुळे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर पिसाळ यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. विट्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह संबंधित रुग्णालयाला भेट देऊन जखमीची विचारपूस केली. सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे तपास करीत आहेत.

  • दोघांना अटक; दोघे फरारी

या प्रकरणातील राहुल जाधव आणि सुनील पवार या दोघांना विटा पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सागर चोथे आणि विनोद सावंत फरारी आहेत.

Previous Post

कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान

Next Post

सांगली ब्रेकिंग | कारखान्याच्या गोडावूनला भीषण आग, कोठ्यावधीचे नुकसान..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | कारखान्याच्या गोडावूनला भीषण आग, कोठ्यावधीचे नुकसान..

सांगली ब्रेकिंग | कारखान्याच्या गोडावूनला भीषण आग, कोठ्यावधीचे नुकसान..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group